SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदकेंद्र सरकारच्या ऊस नियंत्रण धोरणाविरोधात जय शिवराय किसान संघटनेची कोल्हापुरात पत्रकार परिषद; नवीन कायद्यावर कडाडून टीकाधक्कादायक! 'तो' कुटुंबासह कोकण दर्शनाला गेला अन मागे मित्रानेच लुटले घर; कोल्हापुरात १५ लाखांच्या दागिन्यांसह एक गजाआडडीकेटीईच्या विद्यार्थ्यांची हरियाणा येथील बूटकॅम्पमध्ये चमकदार कामगिरीराष्ट्रीय डेंग्यू दिवस: जनजागृती आणि सतर्कतेची गरजवैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी दिव्यांगांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ : मंत्री अतुल सावेचंदगड तालुक्यात खळबळ: पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या वृद्धाचा सांगाडा शेतात आढळलाकोल्हापूरची हद्दवाढ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; २०२७ च्या जनगणनेनंतर हद्दवाढ अटळच : आमदार राजेश क्षीरसागरनळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती द्या : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरपरमेश्वरावरील गाढ श्रद्धेमुळेच माणूस माणसात राहतो : मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपद

schedule16 May 26 person by visibility 113 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा 2025-26 मध्ये दमदार 109 गुणांची कमाई करत फिजिओथेरपी कॉलेज संघाने सलग दुसऱ्या वर्षी सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. 

विजेत्या संघांना डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील आणि कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांच्या हस्ते चषक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. फिजिओथेरपी कॉलेजची श्रावणी अशोक जंगटे आणि स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचा सोहम राजेश शिंदे यांना ‘उत्कृष्ट खेळाडू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले, “क्रीडा स्पर्धा म्हणजे केवळ जय-पराजय नव्हे, तर नेतृत्व, शिस्त आणि संघभावना शिकवणारे प्रभावी व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी खेळातून आत्मविश्वास, तंदुरुस्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करावा. पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून स्पर्धेला नव्या उंचीवर न्यावे.

कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी सांगितले, “विद्यापीठाच्या आठ संस्थांमधील तब्बल 870 खेळाडूंनी सांघिक व वैयक्तिक अशा 10 विविध क्रीडा प्रकारांत सहभाग घेतला. शिक्षणाबरोबरच खेळ, एनएसएस, एनसीसी आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो. खेळ विद्यार्थ्यांमध्ये निर्णयक्षमता आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित करतात.

या स्पर्धेदरम्यान विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू व संघांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जगमे, डॉ. आर. एस. पाटील, डॉ. ए. एम. गुरव, डॉ. एस. एस. पाटील, डॉ. ग्रंथेज ओतारी, डॉ. मनीषा विजापूरकर, क्रीडा संचालक शंकर गोनुगडे, सुशांत कायपुरे यांच्यासह सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व क्रीडा विभागप्रमुख उपस्थित होते. शंकर गोनुगडे यांनी आभार मानले.

विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष सतेज पाटील आणि विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी विजेत्या संघांसह सर्व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes