SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राधानगरी धरणाचे तीन दरवाजे उघडलेमाजी सैनिक सुरक्षा रक्षकांचा थकीत वेतन फरक विद्यापीठ फंडातून द्या; आमदार सतेज पाटील यांची उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणीकाँग्रेसचा मेळावा यशस्वी करूया; माजी नगरसेवकांच्या बैठकीत निर्धारराज्यात सहा जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट परिसरात रेड अलर्ट ॲट्रॉसिटी कायद्याबाबत जनजागृतीसाठी कार्यशाळा घ्या: जिल्हाधिकारी अमोल येडगेई वॉर्डचा पाणी पुरवठा राहणार बंदराज्यातील धोकादायक शाळा इमारतींचे सर्वेक्षण करावे : शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयरडॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकला भारत सरकारकडून पेटंटटॉप २०० मध्ये घोडावत विद्यापीठ; स्वयंम-एनपीटीईएल अ‍ॅक्टिव्ह लोकल चॅप्टर्स तर्फे 'A' श्रेणी कोरे अभियांत्रिकीचे तसेच एमबीए, एमसीए प्रवेश यावर्षी वारणा विद्यापीठामधून; महाराष्ट्रातील पहिले राज्य सार्वजनिक समूह विद्यापीठ

जाहिरात

 

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ५६० विद्यार्थ्यांना विविध कंपनीमध्ये नोकरी; २७ लाखांचे सर्वोच्च पॅकेज; १८० हून अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग

schedule24 Jul 25 person by visibility 368 categoryशैक्षणिक

कसबा बावडा : डी  वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा येथील ५६० हुन अधिक विद्यार्थ्यांना नामांकित  आंतरराष्ट्रीय  आणि  राष्ट्रीय  कंपन्यांमध्ये उत्तम नोकरीची संधी महाविद्यालयाने मिळवून दिली आहे. यामध्ये २७ लाखांचे सर्वोच्च सॅलरी पॅकेज मिळाले असून सरासरी ४.५ लाखांचे पॅकेज विद्यार्थ्यांना मिळाले आहे. उत्कृष्ट शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात असल्याने यावर्षीही विक्रमी संख्येने प्लेसमेंट करता आल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील व विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी सांगितले.

डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, विद्यार्थ्याना सर्वोत्तम शिक्षण देतानाच, विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याला दिशा देण्याचे काम केले जाते. गुणवत्ता, आधुनिक तंत्रज्ञान, आणि नैतिक मूल्यांचा समतोल राखत आम्ही विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनवण्यासाठी कार्यरत आहोत. महाविद्यालयाच्या सामुहिक प्रयत्नामुळे हे यश मिळाले आहे.

 ऋतुराज पाटील म्हणाले, महाविद्यालयाचा स्वायत्त दर्जा, नॅक व एनबीए मानांकन,  उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा यामुळे  सर्वच क्षेत्रात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.  विद्यार्थ्याना नामवंत कंपनीमध्ये नोकरी मिळावी यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नाना चांगले यश मिळाले आहे. आयटी क्षेत्राबरोबरच मेकॅनिकल, केमिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन्सच्या विद्यार्थानाही चांगल्या जॉब ऑफर्स मिळाल्या आहेत. यावर्षी सुमारे ५६०  हून अधिक प्लेसमेंट करता आल्या याचे समाधान आहे. 
 
कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, यावर्षी   १८०  हून अधिक  कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सहभाग घेतला. ४० हून अधिक विद्यार्थ्यांना ६ लाख तर सुमारे  १५० विद्यार्थांनी ४ लाख पेक्षा जास्त सॅलरी पॅकेज मिळाले आहे. महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागातर्फे कंपन्यांची गरज ओळखून कोडिंग स्किल्स , गुगल डेव्हलपर क्लब, परदेशी भाषा, बिजनेस कम्युनिकेशन स्किल्स , सॉफ्ट स्किल आणि ऍप्टिट्यूड ट्रेनिंग दिले जाते. याचा चांगला फायदा विद्यार्थ्यांना प्लेसमेंटवेळी झाला. 

 प्राचार्य  डॉ. संतोष चेडे म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी विविध क्लब, फ्रेंच, जर्मन आणि जापनीज भाषांचे कोर्सेस या माध्यमातून  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकासासाठी तयारी करून घेतली जाते. तसेच विद्यार्थ्यांचा औद्योगिक विश्वाशी संबंध येणासाठी विविध सामंजस्य करार , समाजपयोगी प्रकल्प आणि इंटर्नशिप असे उपक्रम वर्षभर राबविले जातात.

 अधिष्ठाता (सीडीसीआर)  प्रा. सुदर्शन सुतार म्हणाले, जस्पे, सिस्को, हेक्सावेअर, इंडोव्हांस, इन्फोसिस, टेकमहिंद्रा, टेक्नीमॉन्ट, टोयो इंजिनीअरिंग,  विप्रो पारी, कन्ट्रोल एस, ईवाय जीडीएस, फोर्स मोटर्स, व्हिजन वेव्स यासह विविध नामांकित कंपन्यामध्ये नोकरी मिळवल्या आहेत. विद्यार्थांनी औदयोगिक क्षेत्रानिगडित काळाची गरज ओळखून ट्रेनिंग दिले जाते. या विद्यार्थांनी आयटी क्षेत्रातसुद्धा मोठ्या पॅकेजच्या ऑफर्स मिळवल्या आहेत. 
 
 ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर  प्रा.मकरंद काईंगडे म्हणाले, बदलत्या काळानुसार कोडींग स्किल्स बरोबरच एआर -व्हीआर, आरपीए, एडब्ल्यूएस, क्लाउड कॉम्प्यूटिंग, सायबर सीक्युरीटीचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच स्पर्धा परीक्षा तयारी, परदेशी उच्च शिक्षणाच्या तयारीसाठी इन हाऊस कोचिंग व तज्ञ लोकांचे सेमिनार पण घेतले जातात.

या निवडीकरता संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज संजय  पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, प्रा. रविंद्र बेन्नी यांचे  प्रोत्साहन व सहकार्य लाभले.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes