काँग्रेसचा मेळावा यशस्वी करूया; माजी नगरसेवकांच्या बैठकीत निर्धार
schedule25 Jul 25 person by visibility 387 categoryराजकीय

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या शनिवारी 26 जुलै रोजी काँग्रेसचा निर्धार मेळावा होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कोल्हापूर महानगरपालिका
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने कंबर कसली असुन उद्या शनिवारी 26 जुलै रोजी महानगरपालिका क्षेत्रातील माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी काँग्रेसच्या माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची अजिंक्यतारा कार्यालय या ठिकाणी बैठक झाली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आता तयारी सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस मधील काही नगरसेवकांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी आज झालेल्या बैठकीला काँग्रेसचे सर्व माजी नगरसेवक उपस्थित होते. उद्या शनिवारी होणारा निर्धार मेळावा सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या निर्धार मेळाव्यात खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
बैठकीत, निर्धार मेळाव्याच्या दृष्टीन प्रत्येक प्रभागनिहाय आढावा घेण्यात आला. येणाऱ्या मनपा निवडणुकीत पुनर्रचना आणि प्रभागांची संख्या वाढणार असल्याने त्यादृष्टीनेही या बैठकीत चर्चा झाली. काँग्रेसचा निर्धार मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा मेळावा यशस्वी करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीला माजी उपमहापौर संजय मोहीते, मधुकर रामाणे, भूपाल शेटे, इंद्रजीत बोंद्रे संदीप नेजदार दुर्वास कदम, प्रताप जाधव, अर्जून माने, ईश्वर परमार, सुभाष बुचडे, विनायक फाळके, तौफीक मुल्लाणी, दुर्वास कदम, सुयोग मगदूम, धीरज पाटील, श्रावण फडतारे, भैया शेटके, मोहन सालपे स्वप्नील तहसिलदार, शशिकांत पाटील, शिवानंद बनछोडे, राजू साबळे, सुजय पोतदार, जय पटकारे, अमर समर्थ, संजय लाड, उमेश पोवार, संजय पटकारे यांच्या सह माजी नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.