राधानगरी धरणाचे तीन दरवाजे उघडले
schedule25 Jul 25 person by visibility 292 categoryराज्य

कोल्हापूर : धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असून रात्री दहा वाजून एक मिनीटानी क्रमांक तीन व दहा वाजून विस मिनीटानी क्रमांक सहाचा दरवाजा खुला झाला. तर रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी राधानगरी धरणाचा पाचवा दरवाजाही खुला झाला आहे दरम्यान प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
आज दि. 25 जुलै रोजी रात्री 10.03 वा.राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्र. 3 व 6 सुद्धा उघडले आहे. राधानगरी धरणातून विसर्ग - सेवाद्वार क्र. 6 व 3 मधून 2856 cusec व BOT पॉवर हाऊस मधून 1500 cusec असा एकूण 4356 cusec इतका विसर्ग नदी पात्रात सुरु आहे. यामुळे नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे
दि.25 जुलै रोजी रात्री 10:00 वा. राजाराम बंधारा पाणी पातळी 24'0" (537.50 m), विसर्ग 17998 cusecs (नदी इशारा पातळी 39'00" व धोका पातळी 43'00") कोल्हापूर जिल्ह्यातील बारा बंधारे पाण्याखाली आहे.