SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अवकाश संशोधनाला गती देण्यासाठी प्रा. राजमल जैन यांच्या विशेष व्याख्यानांचे शिवाजी विद्यापीठाकडून आयोजनडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ३ विद्यार्थ्यांना २७ लाखांचे पॅकेजकारगिल विजय दिवस उत्साह आणि अभिमानाने साजरायेणाऱ्या काळात आरोग्यसेवेसाठी खर्चच करावा लागणार नाही : खासदार डॉ. श्रीकांत शिंदेकोल्हापूर जिल्ह्यात ९ ऑगस्ट पर्यंत बंदी आदेश लागूडीकेटीईमध्ये प्रथमवर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्यास उत्स्फुर्त प्रतिसादस्वप्न मोठी ठेवा: विनायक भोसले; घोडावत विद्यापीठात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागतराधानगरी धरणाचे तीन दरवाजे उघडलेमाजी सैनिक सुरक्षा रक्षकांचा थकीत वेतन फरक विद्यापीठ फंडातून द्या; आमदार सतेज पाटील यांची उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणीकाँग्रेसचा मेळावा यशस्वी करूया; माजी नगरसेवकांच्या बैठकीत निर्धार

जाहिरात

 

माजी सैनिक सुरक्षा रक्षकांचा थकीत वेतन फरक विद्यापीठ फंडातून द्या; आमदार सतेज पाटील यांची उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी

schedule25 Jul 25 person by visibility 281 categoryराज्य

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात माजी सैनिक सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांना निवृत्त होऊन ७ ते ८ वर्षे झाली आहेत, परंतु अद्याप त्यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतनातील व निवृत्तिवेतनातील फरक, रजा रोखीकरण, तसेच गेल्या १२ वर्षांतील पदोन्नतीमधील फरक रक्कम मिळालेली नाही. गेली ५ ते ६ वर्षे विद्यापीठाने याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव सहसंचालक उच्चशिक्षण यांच्याकडे पाठविला नसल्याचे समजते. परिणामी, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे थकीत सातव्या वेतन आयोगातील वेतन फरक रक्कम विद्यापीठ फंडामधून द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे शुक्रवारी निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की, या गंभीर प्रश्नांकडे माजी सैनिक सुरक्षारक्षकांनी वेळोवेळी लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने संबंधित माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी २१ जुलैपासून विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

 विद्यापीठ फंडातून विद्यापीठाचे प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचा पगार केला जातो. त्यामुळे माजी सैनिकांची थकीत रक्कमही याच फंडातून द्यावी, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes