टॉप २०० मध्ये घोडावत विद्यापीठ; स्वयंम-एनपीटीईएल अॅक्टिव्ह लोकल चॅप्टर्स तर्फे 'A' श्रेणी
schedule25 Jul 25 person by visibility 278 categoryशैक्षणिक

अतिग्रे : येथील संजय घोडावत विद्यापीठाने स्वयंम-एनपीटीईएलतर्फे (IIT मद्रास) तर्फे आयोजित जानेवारी – एप्रिल २०२५ सत्रात उल्लेखनीय यश संपादन केले .'टॉप २०० अॅक्टिव्ह लोकल चॅप्टर्स' मध्ये आपले स्थान निश्चित करून 'A’ या विशेष श्रेणीत युनिव्हर्सिटीने राष्ट्रीय स्तरावर हजारो लोकल चॅप्टर्समधून निवड होऊन उल्लेखनीय स्थान मिळवले.
१९ जुलै रोजी आयआयटी मुंबई येथे हा सोहळा पार पडला. या सत्रात युनिव्हर्सिटीतून एकूण १५९९ विद्यार्थ्यांनी एनपीटीईएल कोर्सेसमध्ये सहभाग नोंदवला. त्यापैकी – २१ विद्यार्थ्यांना गोल्ड सर्टिफिकेट, ४१९ विद्यार्थ्यांना एलिट, १४२ विद्यार्थ्यांना सिल्व्हर, तर ३९२ विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या कोर्स पूर्ण करून प्रमाणपत्रे प्राप्त केली.तसेच २० विद्यार्थी कोर्स टॉपर्स ठरले.
या यशामध्ये SPOC आणि विद्यापीठाचे कोर्स समन्वयक प्रा. निलेश विजय सबनीस यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले. त्यांना एनपीटीईएलतर्फे विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. यासोबतच प्रत्येक विभागातील विभागीय समन्वयकांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून या यशात मोलाची भर घातली.
कुलगुरू प्रो.उद्धव भोसले यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, "या यशामुळे संजय घोडावत विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता राष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. तसेच पुढील टप्प्यात ‘AA’ किंवा ‘AAA’ श्रेणी प्राप्त करण्याचा आत्मविश्वास आम्हाला मिळाला आहे".तसेच सर्व डीन आणि विभागप्रमुखांचे अभिनंदन करत उत्कृष्ट सहकार्याबद्दल कौतुक केले. चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी देखील सर्व शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.