डी.वाय.पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग- फिजीओथेरपी संघ विजेते; डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा
schedule13 Oct 25 person by visibility 56 categoryक्रीडा

कोल्हापूर : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ आयोजित आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत मुलांच्या गटात डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट तर मुलींच्या गटात डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरपी संघाने अजिंक्यपद पटकावले. कसबा बावडा येथील अभिमत विद्यापीठाच्या हॉलमधील अत्याधुनिक मॅटवर ही स्पर्धा झाली.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. अद्वैत राठोड, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे डॉ. अजित पाटील, क्रीडा संचालक शंकर गोणुगडे, डॉ. जगन्नाथ शेटे, सुशांत कायपुरे यांच्यासह सर्व कॉलेजचे स्पोर्ट्स इन्चार्ज उपस्थित होते.
या स्पर्धेत मुलींच्या गटात कॉलेज ऑफ फिजीओथेरपी संघाने अंतिम सामन्यात डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज संघाला 19-13 गुण फरकाने पराभूत करत स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
मुलांच्या गटात झालेल्या अंतिम सामन्यात डी. वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट संघाने कॉलेज ऑफ फार्मसी संघाला 30-15 गुण फरकाने पराभूत करत स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज एस. पाटील, विश्वस्त पृथ्वीराज एस. पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.