फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली भरघोस परताव्याचे आमिष दाखवून फसणुक करणाऱ्या मुख्य फरार आरोपी अटक
schedule13 Oct 25 person by visibility 107 categoryगुन्हे

कोल्हापूर : हुपरी पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हयामध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाकडून विविध कंपन्या आणि फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली भरघोस परताव्याचे आमिष दाखवून फसणुक करणारा मुख्य फरार आरोपीस अटक करण्यात आली फरार मुख्य आरोपी राजेंद्र भिमराव नेर्लीकर याने त्याचा मुलगा आरोपी बालाजी राजेंद्र नेलींकर हा Forex Trading मध्ये पारंगत असून तो सुमारे ४५ दिवसांमध्ये गुंतवलेली रक्कम दुप्पट करु शकतो असे सांगून फिर्यादी विनायक पाटील आणि इतर गुंतवणुकदार यांची एकूण रुपये १२,३५,३५,१३८/- इतक्या रकमेची आर्थिक फसवणूक केलेली होती म्हणून फिर्यादी यांनी रितसर फिर्याद दिलेने दि.२२ ऑक्टोंबर रोजी हुपरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
या गुन्ह्याचा पुढील तपास हा आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु असताना मुख्य आरोपी राजेंद्र नेलींकर याचा मुलगा बालाजी नेलींकर यास तात्काळ अटक करण्यात आली होती. पण मुख्य आरोपी राजेंद्र नेलींकर हा गुन्हा दाखल झाले दिनांकापासून फरार होता.
त्यानंतर, दि. १२ ऑक्टोंबर रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक, सुवर्णा पत्की यांना फरार व मुख्य आरोपी राजेंद्र नेलींकर याच्या निश्चित ठावठिकाणाबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार विजय काळे यांनी दिलेल्या गोपनिय माहितीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांचे नेतृत्वाखाली तातडीने तपास पथक तयार करुन ते रवाना केले असता सदर फरार व मुख्य आरोपी राजेंद्र भिमराव नेर्लीकर हा आदमापुर येथील हॉटेल त्रिशा येथे मिळून आलेने त्यास नमुद दाखल गुन्ह्यात अटक करुन जिल्हा व सत्र न्यायालय, इचलकरंजी यांचे समोर हजर केले असता न्यायालयाने अटक मुख्य आरोपी राजेंद्र भिमराव नेलींकर यास शनिवार, दि. १८ ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे,
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता व पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश इंगळे, पोहवा/विजय काळे, पोहवा/राहुल गायकवाड, पोहवा/रविंद्र गायकवाड, पोशि/विपुल माळी आणि चालक पोहवा/सुनिल गावडे यांनी केलेली आहे.
तरी अटक मुख्य आरोपी राजेंद्र नेलींकर व त्याचा मुलगा बालजी नेलींकर यांचेकडून आणखी कांही गुंतवणुकदार यांची फसवणुक झालेली असेल तर अशा पिडीत गुंतवणुकदारांनी आर्थिक गुन्हे शाखा, कोल्हापूर तिसरा मजला, पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी सकाळी १०.०० वा ते १७.०० वा या वेळेमध्ये संपर्क साधून तक्रार दाखल करावी असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखा, कोल्हापूर यांचेवतीने करण्यात येत आहे.