एसएसएसी बोर्ड परिक्षेत डीकेटीईच्या हायस्कूल विभागाचा राज्यात ठसा - रुजूल कनूंजे याने मिळविले १०० टक्के गुण
schedule15 May 25 person by visibility 400 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये पार पडलेल्या इ. १० वी च्या एस.एस.एसी. बोर्ड परिक्षेत डीकेटीई सोसासयटीच्या सर्व हायस्कूलने सलग १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राखत राज्यात आपली शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित केली आहे. डीकेटीईच्या एकूण ९३ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत, त्यापैकी ३४ विद्यार्थ्यांनी ९५ टक्के हून अधिक गुण मिळवून डीकेटीईच्या गुणवत्तेची हमी हा ठसा पुन्हा एकदा सिध्द केला आहे. यातील सर्वात उल्लेखन्नीय कामगिरी इचलकरंजी हायस्कूलच्या रुजूल कनूंजे याने केली असून त्याने १०० टक्के गुण मिळवून अव्वल क्रमांक पटकविला आहे.
डीकेटीईची स्थापना झाल्यापासून डीकेटीई ने शैक्षणिक क्षेत्रात नेहमी प्रगतीचा चढता आलेख ठेवलेला आहे. शैक्षणिक क्षेत्रात आदर्श कार्य करणारी संस्था म्हणून डीकेटीई संस्थेचा नावलौकीक जागतिक पातळीवर होत आहे. डीकेटीईच्या ज्ञानाचा वापर इचलकरंजी परिसरातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना व्हावा या हेतुने विद्यार्थ्यांना उच्च व गुणवत्तापूर्वक शिक्षण देता यावे यासाठी डीकेटीईने सर्व शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत त्याचेच फलित म्हणून यंदाच्या १० वी बोर्ड परिक्षेत विद्यार्थी १०० टक्के मार्क्स मिळवून राज्यात आघाडीवर येत आहेत ही बाब इचलकरंजीसाठी भूषणावह आहे अशी प्रतिक्रिया माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी या कार्यक्रमामध्ये व्यक्त केली.
शाळानिहाय निकाल -
इचलकरंजी हायस्कूल - ५५ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा अधिक गुण, आर्या कामिरे - ९८.६० टक्के, अनुष्का पाटील - ९८.४० टक्के . मराठी मिडीयम हायस्कूल, नारायण मळा - २१ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा अधिक गुण भूमी गोंदकर -९७.४० टक्के, सिध्दी पोवार - ९७.०० टक्के. इंग्लिश मिडीयम हायस्कूल, १७ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा अधिक गुण, आर्या संगवे - ९७.२० टक्के, देवयानी बडवे - ९५.६० टक्के, दिप्ती मोरबाळे - ९५.०० टक्के. डीकेटीई इंटरनॅशनल स्कूल, तारदाळ (सीबीएसई) आयान नदाफ - ९२.२० टक्के, प्रक्षल कोरेगांवकर - ८९.८० टक्के, अविष्कार पाटील - ८७.०० टक्के
यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ कार्यक्रम संस्थेमध्ये संपन्न झाला या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डाॅ. सपना आवाडे, ए.बी.सौंदत्तीकर, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त, इचलकरंजी हायस्कूलच्या प्राचार्या व्ही.एच.तेलंग,पी.एम.सातवेकर, एन.एच.गाडेकर,माला सूद,बी.व्ही.कासार,जी.बी.खानाज,अविनाश दानोळे यांचेसह शिक्षक, पालक, आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीएओ पी.एम.भागाजे यांनी केले, आभार माला सूद यांनी मानले तर सुत्रसंचलन पी.बी.कांबळे व जी.एस.केतकर यांनी केले.