SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात १७ मे रोजी निघणार तिरंगा पदयात्राएसएसएसी बोर्ड परिक्षेत डीकेटीईच्या हायस्कूल विभागाचा राज्यात ठसा - रुजूल कनूंजे याने मिळविले १०० टक्के गुणडीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींगमधील ३ विद्यार्थ्यांची शासकीय विभागात नोकरीसाठी निवडराजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोमवारी रोजगार मेळाव्याचे आयोजनपी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी ३१ मे पर्यंत विशेष मोहीमअंबाबाई मंदिरमध्ये वस्त्र संहिता लागू केल्याबद्दल सकल हिंदू समाज, हिंदुत्ववादी संघटनांकडून आनंदोत्सवखेलो इंडिया यूथ गेम्समध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या ऐश्वर्याचे सुवर्ण!कोल्हापूर विमानतळाला ‘छत्रपती राजाराम महाराज’ यांचे नाव देण्यासाठी प्रयत्नशील : केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ१८५७च्या लढ्याचे आद्य क्रांतिकारक कोल्हापूरचे छत्रपती चिमासाहेब महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनकोल्हापुरातअट्टल मोटर सायकल चोरट्यास अटक; ७ मोटर सायकली जप्त

जाहिरात

 

१८५७च्या लढ्याचे आद्य क्रांतिकारक कोल्हापूरचे छत्रपती चिमासाहेब महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

schedule15 May 25 person by visibility 337 categoryसामाजिक

कोल्हापूर  : कोल्हापूर राजघराण्यात जन्माला आलेले चिमासाहेब महाराज यांनी ब्रिटिश राजवटीस झुगारून विरोध करून दक्षिण भारतात १८५७ मधे लढा उभा केला. कोल्हापूरसह अनेक संस्थानांत जहागीरीत या लढ्याचे लोन पसरले म्हणून महाराजांना पकडून कराची येथे राजकैदी म्हणून ११ वर्षे बंदीवासात ठेवले तेथेच त्यांची अखेर १५ मे १८६९ रोजी झाली. अशा थोर क्रांतीविरला आज अभिवादन करण्यात आले.

 छ. चिमासाहेब उद्यान सीपीआर चौक येथिल त्यांच्या पुतळ्याचे पूजन कोल्हापूर महानगरपालिकेचे उपशहर अभियंता सुरेश पाटील यांनी केले तर महाराजांचे वारस सुर्यराज राजेभोसले, वैभवराज राजे भोंसले यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. त्याऩतर महाराजांच्या इतिहासिला उजाळा अनिल घाटगे सरांनी करून दिला.

  यावेळी किशोर घाटगे, वसंतराव मुळीक, अनिल घाटगे, रविंद्र गुरव, संजय सिंह घाटगे,सागर शिंदे, राहुल फल्ले इ. यावेळी क्रांतीवीर छ‌.चिमासाहेब महाराज सां.मंडळ ,मराठा महासंघ, कोल्हापूर महानगरपालिका चे अधिकारी, विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes