अंबाबाई मंदिरमध्ये वस्त्र संहिता लागू केल्याबद्दल सकल हिंदू समाज, हिंदुत्ववादी संघटनांकडून आनंदोत्सव
schedule15 May 25 person by visibility 282 categoryसामाजिक

कोल्हापूर : काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमार्फत अंबाबाई मंदिरासह जोतिबा मंदिर येथे वस्त्र संहिता लागू करण्यात आली होती. त्या निर्णयाचे स्वागत करत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव माननीय शिवराज नायकवडे यांचा सकल हिंदू समाज व हिंदुत्ववादी संघटनांकडून फेटा बांधून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पूर्ण पारंपारिक वेशामध्ये अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
आई अंबाबाईचे शक्तीपीठ हा कोल्हापूरचा आत्मा आहे. गेल्या चार वर्षांपासून "सकल हिंदू समाज" या हिंदुत्ववादी संघटनेकडून आणि समस्त कोल्हापूरकरांकडून मागणी होत होती, की मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी एक ठराविक ड्रेस कोड असावा. मंदिराचे पावित्र्य राखले जावे यासाठी अंगप्रदर्शन करणारे तोकडे कपडे न घालता भारतीय पारंपारिक वेशभूषेत मंदिरात दर्शनासाठी यावे. वस्त्र संहितेच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल भाविकांकडून ड्रेस कोडसाठी चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी बंडा साळुंखे, उदय भोसले, किशोर घाटगे, सुनील पाटील, अनिल चोरगे,निरंजन शिंदे, सिद्धार्थ कटकधोंड, मनोहर सौरप, योगेश केळकर, पांडुरंग पाटील, रश्मी साळुंखे, सविता खोराटे, रूपाली साळोखे, सुजाता पाटील, प्रशांत पाटील, अभिजीत पाटील, तन्मय गुरव, रोहिणी केसरकर यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.