डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींगमधील ३ विद्यार्थ्यांची शासकीय विभागात नोकरीसाठी निवड
schedule15 May 25 person by visibility 130 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील तीन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध सार्वजनिक क्षेत्रात नोकरीसाठी निवड झाली आहे. सध्या सिव्हील इंजिनिअरींग क्षेत्रात सरकारी नोक-यांची मोठया प्रमाणावर मागणी आहे. या संधीचा लाभ डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना मिळावा,या हेतुने डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी सरकारी नोकरीसंदर्भात तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान, कार्यशाळा आयोजित केल्या जातात. यामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळत असून सरकारी नोकरी मिळविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी डीकेटीई एक सक्षम मंच ठरत आहे अशी प्रतिक्रया यावेळी विद्यार्थी व पालकांनी दिली.
ओंकार सांगले याची रचना सहाय्यक म्हणून नगर रचना व मूल्य निर्धारण विभागमध्ये निवड झाली आहे. रणजीत कोळेकर याची जलसंधारण अधिकारी म्हणून मृदा व जलसंधारण विभागामध्ये तर मोईन बागवान याची ज्युनिअर इंजिनिअर म्हणून ग्रामीण पाणीपुरवठा विभाग खात्यात निवड झाली आहे.
डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश उल्लेखन्नीय आहे. नुकतेच डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग कोर्सला एनबीए चे मानांकन प्राप्त झाले आहे. देशातील शिक्षण व्यवस्थेत या मानांकनाला अत्यंत मानाचे आणि विश्वासार्ह स्थान आहे यामुळे विद्यार्थी,पालक,इंडस्ट्रीज व एकूण समाजालाच उत्कृष्ट शिक्षणांची हमी या एनबीए मानांकामुळे मिळते. याचा फायदा डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना होत आहे. संस्थेमध्ये उपलब्ध असलेले सुसज्ज लायब्ररी, अत्याधुनिक सॉफ्टवेरर्स अधुनिक शिक्षण सुविधा, विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परिक्षा व सरकारी नोकरीसाठी सक्षम बनवत आहे. याच गुणवत्तेच्या बळावर, सिव्हील इंजिनिअरींग विभागातून विद्यार्थ्यांचे शंभर टक्के प्लेसमेंट देखील यशस्विरीत्या साध्य झाले आहे, अशी प्रतिक्रीया संचालिका डॉ एल.एस.अडमुठे यांनी व्यक्त केली.
सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे निश्चितच कौतुकास पात्र आहे. डीकेटीईचा सिव्हील इंजिनिअरींग विभाग,विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आधारित ज्ञान देण्यास नेहमी कटिबध्द आहे. भविष्यात अधिकाअधिक विद्यार्थ्यांची सरकारी नोक-यांमध्ये निवड व्हावी, यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशिल राहील,असा विश्वास संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे यांनी यावेळी व्यक्त केला.
सदर विद्यार्थ्याच्या या यशाबददल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व संचालक यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, विभागप्रमुख ए.एल.मुल्ला यांचे मागदर्शन मिळाले.