राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोमवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन
schedule15 May 25 person by visibility 214 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेला (PMNAM) अंतर्गत शिकाऊ उमेदवारी भरती तथा रोजगार मेळावा सोमवार दिंनाक 19 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून वाजले पासून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा रोड, कोल्हापूर येथे आयोजित केला आहे.
या मेळाव्यांस जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील नामांकीत आस्थापना सहभागी होणार आहेत. आयटीआय उत्तीर्ण व शिकाऊ उमेदवारी उत्तीर्ण तसेच इतर पदवी व पदविकाधारक, बारावी पास, बारावी नापास उमेदवारांनी मार्कलिस्ट व आधारकार्ड घेवून मेळाव्यास उपस्थित रहावे,
असे आवाहन एम. एस. आवटे, प्राचार्य तथा सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार (तां), मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र व्दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर यांनी केले आहे.