इचलकरंजी येथे ३०,०००/- रूपयांची लाच स्वीकारताना महावितरण विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंता जाळ्यात
schedule13 May 25 person by visibility 360 categoryगुन्हे

इचलकरंजी : अर्पाटमेंट मधील १८ फ्लॅटचे विज जोडणी मंजुरी करीता महावितरण विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंता वर्ग १, प्रशांत राठी यांने तक्रारदार यांचेकडे १८ फ्लॅटचे प्रत्येकी ५०००/- प्रमाणे एकूण ९००००/- रु दयावे लागतील तरच प्रकरण मंजुर होईल असे म्हणुन तक्रारदार यांचेकडे ९०,०००/- रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ३०,०००/- रूपयांची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता प्रशांत ताराचंदजी राठी ( वय ४९ वर्षे, इचलकरंजी, सद्या रा. उपकार रेसीडेन्सी प्लॅट नंबर ०६, बिग बझार जवळ सांगली रोड इचलकरंजी) यास पकडणेत आले.
याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार हे इलेक्ट्रीक कॉन्ट्रक्टर असुन ते इलेक्ट्रीक फिटींगची कामे घेत असतात. त्यांनी इचलकरंजी येथील एका अर्पाटमेंट मधील १८ फ्लॅटचे विज जोडणीचा ठेका संबधीत मालकाकडून घेतलेला होता. विज जोडणी मंजुरी करीता लागणार अर्ज व अवाश्यक ती कागदपत्र जोडून तक्रारदार यांनी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी उपविभाग, इचलकरंजी येथे दिलेली होती. हा अर्ज मंजुर होण्यासाठी तक्रारदार हे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना भेटले असता त्यांनी तक्रारदार यांचेकडे १८ फ्लॅटचे प्रत्येकी ५०००/- प्रमाणे एकूण ९००००/- रु दयावे लागतील तरच प्रकरण मंजुर होईल असे म्हणुन तकारदार यांचेकडे ९०,०००/- रूपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे तकार दिलेली होती.
तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे दिलेल्या तकार अर्जाप्रमाणे पडताळणी केली असता पडताळणीमध्ये तक्रारदार यांचेकडे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांनी तक्रारदार यांचेकडे मागणी केलेल्या ९०,०००/- रूपयांच्या लाच मागणी केली तडजोडीअंती ३०,०००/- रूपयांची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता प्रशांत राठी त्यांना पकडणेत आले.
याबाबत आरोपी प्रशांत ताराचंदजी राठी यांचे विरूध्द शिवाजीनगर पोलीस ठाणे, इचलकरंजी, जि. कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. .
सदरची कारवाई शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे. विजय चौधरी, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे यांचे मार्गदर्शनानुसार वैष्णवी पाटील, पोलीस उप अधीक्षक, स.पो. फौ. प्रकाश भंडारे, पो.हे.कॉ. विकास माने, पो.हे.कॉ. संदिप काशीद, पो.ना. सचिन पाटील, पो.कॉ. उदय पाटील, चालक स.पो. फौ. गजानन कुराडे, चा.पो.कॉ. प्रशांत दावणे, ला.प्र.वि. कोल्हापूर अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर यांनी केली आहे.