प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्याकडून पाच हजार रुपये दंड वसूल
schedule23 Jan 26 person by visibility 52 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरात एकल वापर प्लॅस्टिकच्या पथकाद्वारे तपासणी आज करण्यात आली. हि तपासणी लक्ष्मीपुरी परिसरातील दुकानांमध्ये करताना प्लॅस्टीकचा साठा या ठिकाणी आढळून आला. त्यामुळे लक्ष्मीपूरी येथील विपुल एजन्सी या व्यापाऱ्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाच हजार रुपयांचा दंड करुन तो वसूल केला.
महापालिकेच्यावतीने शहरात एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेची प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. हि मोहिम प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उप-आयुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. आजची ही कारवाई व सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील शहर समन्वयक हेमंत काशीद, मेघराज चडचणकर, आरोग्य निरीक्षक स्वप्निल उलपे, शुभांगी पोवार, मुकादम व कर्मचारी यांच्या मार्फत करण्यात आली. यावेळी व्यापा-यांस येथून पुढे प्लास्टिकचा वापर न करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या. सर्वांनी सिंगल युज प्लॅस्टीकचा वापर टाळावा व कापडी पिशवीचा वापर करावा असे आवाहनही यावेळी महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
तरी महानगरपालिकेच्या हद्दीमधील सर्व आस्थापना, व्यापारी व संस्था यांनी एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर बंद करावा. जर शहरामध्ये एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर करताना आढळल्यास त्या आस्थापना, संस्था व नागरीकांवर आरोग्य विभागामार्फत दंडात्मक कांरवाई करण्यात येणार आहे.