आयआयएम बेंगलोर–तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय चर्चासत्र
schedule14 Jan 26 person by visibility 63 categoryशैक्षणिक
वारणानगर : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, वारणानगर आणि देशातील अग्रगण्य व्यवस्थापन संस्था भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम), बेंगलोर यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराच्या (MoU) पुढील टप्प्यात महाविद्यालयात सविस्तर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश शैक्षणिक, संशोधन व उद्योगाभिमुख सहकार्य अधिक दृढ करणे हा होता.
वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी प्रा. एन. एच. पाटील आणि कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या प्रसंगी आयआयएम बेंगलोरच्या वतीने मान. डॉ. साईदीप रत्नम (चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, MIJSC, आयआयएम बेंगलोर), नारायण वकील, दिलीप पालवे (आनंद ग्रुप) व त्यांची टीम उपस्थित होती. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.विलास कारजिन्नी, तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. माने, अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे, मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. प्रमोद मुळीक तसेच विविध विभागांचे प्राध्यापक व अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या चर्चासत्रात संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम, उद्योगसंलग्न प्रकल्प, कार्यशाळा, तज्ज्ञांचे अतिथी व्याख्यान, संशोधन उपक्रम तसेच प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक देवाणघेवाणीच्या संधींबाबत सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः ‘लीन मॅन्युफॅक्चरिंग’ विषयातील हॉनर्स डिग्री अभ्यासक्रम अभियांत्रिकी शिक्षणात कशा पद्धतीने समाविष्ट करता येईल, त्याची अभ्यासक्रम रचना, मूल्यांकन पद्धती आणि उद्योगाशी निगडित अंमलबजावणी यावर सविस्तर विचारमंथन झाले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना उद्योगसुसंगत, रोजगाराभिमुख व जागतिक दर्जाची कौशल्ये प्राप्त होतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
आयआयएम बेंगलोरच्या टीमने मान. डॉ. साईदीप रत्नम यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयास भेट देऊन इंटरॅक्शन सेशन घेतले. या सत्रात अधिष्ठाता, विभागप्रमुख व प्राध्यापकांशी शैक्षणिक, संशोधन व उद्योगसंलग्न उपक्रमांबाबत सखोल संवाद साधण्यात आला. मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातील प्रा. सचिन महाडिक, डॉ. एम. आर. जाधव, प्रा. विवेक व्ही. पाटील व प्रा. विश्वजीत व्ही. पाटील यांनी आयआयएम बेंगलोरच्या लीन मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्राम अंतर्गत केलेल्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.