कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक - 2026 सर्व मार्गावरच्या के एम टी बससेवेत कपात
schedule13 Jan 26 person by visibility 92 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक - 2026 कामी मतदान साहित्य व कर्मचारी वर्ग मतदान केंद्रावर पोहोचवणे व परत आणणे इ.आवश्यक कामगिरीसाठी महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसेस अधिग्रहीत करणेत आलेने, दि.14/01/2026 रोजी सकाळ पासून दुपारी 4.00 वा.पर्यन्त व दि.15/01/2026 रोजी दुपारी 2.00 वा.नंतर सर्व मार्गावरील बसेसच्या सर्वच फेऱ्यामध्ये या कपात होणार आहे.
दि.14/01/2026 व दि.15/01/2026 रोजी रद्द होणाऱ्या फेऱ्यांचा विचार करुन सर्व प्रवासी नागरीकांनी रु.40/- चा एक दिवसीय पास खरेदी करताना आपली गैरसोय होणार नाही, याची काळजी घेऊनच एक दिवसीय पास खरेदी करावा.
तरी, सर्व प्रवासी नागरिकांनी वर नमूद तारखांना उपलब्ध होणाऱ्या बससेवेद्वारे प्रवास करुन होणारी गैरसोय लक्षात घेऊन परिवहन उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन उपक्रमामार्फत करणेत येत आहे.

