संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी कोर्सचा पावसाळी परीक्षा निकाल उल्लेखनीय
schedule14 Jan 26 person by visibility 67 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या शॉर्ट टर्म कोर्सेस विभागा अंतर्गत सुरू असलेल्या "ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी" चा शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ मधील महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या पावसाळी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या कोर्समध्ये एकूण पाच विषयांपैकी तीन विषयांचा निकाल १००% टक्के लागला असून विभागातील केसरकर ऋषिकेश यांनी ७८.०० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला, चिखले सूरज यांनी ७७.८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, पाटील सिद्धेश यांनी ७७.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे. अशी माहिती विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे यांनी दिली.
आजच्या औद्योगिक युगात सेफ्टी ऑफिसर ही भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. औद्योगिक अपघात टाळणे, कामगारांच्या जीवित व आरोग्याचे संरक्षण करणे, सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, आपत्कालीन परिस्थितीत योग्य नियोजन करणे तसेच उद्योगांमध्ये सुरक्षित कार्यसंस्कृती निर्माण करणे ही सेफ्टी ऑफिसरची प्रमुख जबाबदारी असते.
औद्योगिकीकरण वाढत असताना इंडस्ट्रियल सेफ्टी तज्ज्ञांची मागणी देश-विदेशात मोठ्या प्रमाणात वाढत असून या क्षेत्रात रोजगाराच्या व्यापक संधी उपलब्ध होत आहेत.
संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या शॉर्ट टर्म कोर्सेस विभागामार्फत विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष उद्योगाभिमुख प्रशिक्षण दिले जात असून त्यामुळे विद्यार्थी उद्योगक्षेत्रात तात्काळ कार्यक्षम ठरत आहेत. या यशाबद्दल इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शन करणाऱ्या विभागप्रमुख, प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे. तसेच संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी या उल्लेखनीय निकालाबद्दल समाधान व्यक्त करून विभागाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.