MAHATET 2025 ची अंतिम उत्तरसूची जाहीर
schedule13 Jan 26 person by visibility 46 categoryराज्य
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची 19 डिसेंबर रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 व 2 च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी, आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे 27 डिसेंबर अखेर पाठविण्याबाबत 19 डिसेंबर रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळवण्यात आले होते.
विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेवून अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन, आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत.
या अंतिम उत्तरसूचीनुसार MAHATET 2025 परीक्षेचा निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आली आहे.

