प्रभाग क्रमांक 11 : गजानन महाराज नगर परिसरात महायुतीच्या उमेदवारांची एकत्रित पदयात्रा
schedule05 Jan 26 person by visibility 178 categoryराजकीय
कोल्हापूर : गजानन महाराज नगरात महायुतीच्या विजयाच्या घोषणा उत्साही वातावरणात शिवसेनेचे उमेदवार सत्यजीत जाधव, भाजपच्या उमेदवार माधुरी नकाते, निलांबरी साळोखे, यशोदा मोहिते यांच्या प्रचारार्थ सोमवारी, सायंकाळी प्रचार फेरी आयोजित केली होती.
संभाजीनगर येथील न्यू इंग्लिश मिडियम स्कूल येथून प्रचारफेरीला सुरुवात झाली. महायुतीच्या विजयाच्या घोषणा देत रॅली मार्गस्थ झाली. उमेदवार सत्यजीत जाधव, माधुरी नकाते, यशोदा मोहिते, निलांबरी साळोखे यांनी मतदाराशी संवाद साधत महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.
गजानन महाराजनगर, गणेश कॉलनी, म्हाडा कॉलनी, वारे वसाहत, संभाजीनगर परिसरातून फेरी पुन्हा न्यू इंग्लिश मिडियम स्कूल येथे दाखल झाली. याप्रचार फेरीत माजी नगरसेवक किरण नकाते, गणेश देसाई, रोहित कारंडे, अरुण वडगावकर, चेतन मोहिते, विवेक कोरडे यांच्यासह प्रभागातील नागरिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

