केआयटीचा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात; माजी विद्यार्थी संघाच्या वतीने या वर्षीपासून विद्यार्थ्यांसाठी ‘बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड’ ची घोषणा .
schedule14 May 25 person by visibility 408 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : येथील कोल्हापूर अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी देशातून परदेशातून सुमारे ४५० हून अधिक माजी विद्यार्थी विद्यार्थिनी प्रत्यक्षात उपस्थित होते.
या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी त्यांच्या त्यांच्या विभागांना भेटी देऊन बदलत्या विभागाच्या स्वरूपाची माहिती करून घेतली. केआयटी च्या स्टार्टअप उपक्रमांची सुद्धा त्यांनी माहिती घेतली.त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आयडिया लॅबला भेट देऊन आधुनिक केआयटीची पाहणी केली. या निमित्याने संस्थेतील निवृत्त प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. स्थापत्य अभियांत्रिकी च्या १९९४-९५ च्या बॅच च्या वतीने त्यांचे वर्गमित्र असणारे व दुर्दैवाने सध्या हयात नसलेले माजी विद्यार्थी सचिन महाजनी,अजित जुवेकर यांच्या नावे या वर्षीपासून स्थापत्य अभियांत्रिकीतील द्वितीय,तृतीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
मुख्य कार्यक्रमात संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी केआयटी च्या सध्याच्या प्रगतीची माहिती उपस्थितांना करून दिली. केआयटी चे माजी विद्यार्थी व सध्या संस्थेचे अध्यक्ष असलेले श्री.साजिद हुदली यांनी माजी विद्यार्थी संघाच्या उद्देश व कार्यप्रणालीची माहिती दिली. माननीय अध्यक्ष पुढे म्हणाले,“ माजी विद्यार्थी म्हणून आपण आपल्या महाविद्यालयाच्या विकासात एक मार्गदर्शक म्हणून मोठे योगदान देऊ शकता. स्वतःच्याही विकासामध्ये ही हा विद्यार्थी संघ आपल्याला नक्कीच फलदायी ठरेल.” त्यानंतर विविध विभागातील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भूतकाळातील आठवणींना उजाळा देत कॉलेजच्या बदलत्या स्वरूपा बद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमामध्ये केआयटी चे सचिव दीपक चौगुले, विश्वस्त सुनील कुलकर्णी, कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲल्युमिनाई असोसिएशन (किटा) चे सचिन पाटील,विद्यानंद बेडेकर,प्रसाद गुळवणी,प्रकाश सोमय्या उपस्थित होते.
प्रा.जहीदा खान व प्रा.श्रुती काशिद यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.अधिष्ठाता,माजी विद्यार्थी संघ डॉ.सुनील कारीदकर यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व्यक्त केले. देशातून तसेच परदेशातून सुमारे १५०० माजी विद्यार्थ्यांनी यु.ट्यूब लाईव्ह च्या माध्यमातून या कार्यक्रमास उपस्थिती लावली.