कैलास गडची स्वारी मंदिराचे विश्वस्त शिवाजी जाधव व चार्टर्ड अकौंटट एम.जी. वालिखिंडी यांच्या निधनाने निरपेक्षपणे सेवा करणारे व्यक्तिमत्त्व हरपले : डॉ. सुनीलकुमार सरनाईक
schedule12 Sep 25 person by visibility 283 categoryसामाजिक

कोल्हापूर : "कैलास गडची स्वारी मंदिराचे विश्वस्त शिवाजी बबेराव जाधव व चार्टर्ड अकौंटट एम.जी. वालिखिंडी यांच्या निधनाने निरपेक्षपणे सेवा करणारे व्यक्तिमत्त्व हरपले आहे " अशा शब्दांत मंदिराचे विश्वस्त डाॅ. सुनीलकुमार सरनाईक यांनी दुःख व्यक्त केले, ते कैलास गडची स्वारी मंदिर येथे झालेल्या शोकसभेत बोलत होते.
प्रारंभी डॉ सरनाईक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ.सरनाईक म्हणाले, "शिवाजी जाधव व एम.जी.वालिखिंडी यांचा मंदिराचे सामाजिक कार्यात नेहमीच उत्स्फूर्तपणे सहभाग असायचा. एखादी जबाबदारी टाकली की ती नेटाने व निःस्वार्थीपणे पार पाडायचे,"
यावेळी उदय कारंजकर, अजित जाधव, तानाजीराव घाटगे, भगवान शिंदे, सत्यजित जाधव यांनी मनोगत व्यक्त केले, प्रास्ताविक विलास गौड यांनी केले. यावेळी मंदिराचे विश्वस्त सर्वश्री अशोक जी.कांबळे, केशव पोवार, गणेश भोसले, प्रदीप मराठे, कमलाकर भोसले, प्रदीप गौड, बबन कांबळे,अनिल गौड, राजेंद्र जाधव, सुधाकर जाधव, बाळासाहेब शिंदे, रोहित कारंडे आदी उपस्थित होते.