कोल्हापूरच्या परंपरेला साजेसा दसरा महोत्सव व्हावा : जिल्हाधिकारी अमोल येडगे
schedule12 Sep 25 person by visibility 169 categoryराज्य

कोल्हापूर : कोल्हापूर हे दर्यादिल शहर म्हणून ओळखले जाते. भारतात म्हैसूरचा दसरा प्रसिद्ध आहे. या दसरा महोत्सवापेक्षाही कोल्हापूरचा दसरा महोत्सव अधिक भव्य दिव्य स्वरूपाचा व्हावा, याची दखल जागतिक स्तरावर घेतली जावी. हा दसरा महोत्सव अधिक यशस्वी होण्यासाठी येथील विविध संस्था व संघटनांनी आपले भरीव योगदान द्यावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केली .
येथील शाहूजी सभागृहात दसरा महोत्सव - 2025 आयोजनाच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. ते पुढे म्हणाले, येथील नागरिक कलासक्त आहे. शहरातील दसरा हा पारंपरिक पद्धतीने साजरा होतो आहे. मात्र यंदा शासनाने येथील दसरा महोत्सवास, राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा दिला असल्याने आपली सर्वांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे यंदाचा महोत्सव हा भव्य दिव्य आयोजनामुळे ओळखला जावा. यामध्ये कोणत्याही स्वरूपाच्या त्रृटी नकोत, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, किरण कांबळे, अशोक शिंदे, आ. ए. नाईक, बी.टी. जाधव, आदित्य बेडेकर, प्रमोद माने आदी उपस्थित होते.
कोल्हापूरच्या परंपरेला साजेसा दसरा महोत्सव व्हावा : जिल्हाधिकारी अमोल येडगे
schedule12 Sep 25 person by visibility 277 categoryराज्य