कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव
schedule12 Sep 25 person by visibility 208 categoryराज्य

कोल्हापूर : दिवाळीनंतर जिल्हा परिषदेची निवडणूक लागणार आहे. त्यासाठीची प्रभाग रचना निश्चित झाली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने ९ सप्टेंबर २५ रोजी अधिसुचना काढली.
दिवाळीनंतर जिल्हा परिषदेची निवडणूक लागणार आहे. प्रभाग रचनेवरून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. अशातच जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण ग्रामविकास विभागाने जाहीर केले आहे.