SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : घरफाळा देयक वितरणास सुरुवात, चालू देयकावर 6 टक्के सवलतकुटुंबाच्या आरोग्याचा भक्कम आधार: फॅमिली डॉक्टरइंधन बचतीसाठी महापालिकेचा पुढाकार; पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा इलेक्ट्रिक वाहनांना प्रतिसादभाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा बार्शी ते सोलापूर एस.टी. प्रवासभगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महान विचारच मानवतेला तारतील : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादनडी. वाय. पाटील पॉलीटेक्निकतर्फे मंगळवारी डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शनकोणताही घटक शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाही : सभापती श्रद्धाताई गायकवाड हरोली व धरणगुत्तीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरजागतिक वारशाचे रक्षक: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनशक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या मंगळवारी सर्वपक्षीय एकवटणार, कसबा बावड्यात मेळावा

जाहिरात

 

कोल्हापूर : घरफाळा देयक वितरणास सुरुवात, चालू देयकावर 6 टक्के सवलत

schedule19 May 26 person by visibility 71 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका कर आकारणी व वसुली विभागामार्फत (घरफाळा) सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी शहरातील एकूण 1 लाख 71 हजार 978 मिळकतींची देयके तयार करण्यात आली असून, सदर देयकांचे पोस्ट विभागामार्फत वितरण सुरू करण्यात आले आहे.

 महानगरपालिका प्रशासनाने शहरातील सर्व मिळकतधारकांना आवाहन केले आहे की, घरफाळा देयक वितरणासाठी येणाऱ्या पोस्टमन यांना आपले संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आदी परिपूर्ण माहिती द्यावी. या माहितीच्या आधारे महानगरपालिकेकडून घरफाळा सवलत योजना तसेच इतर महत्त्वाची माहिती मोबाईलद्वारे मिळकतधारकास सहज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

  सन 2026-27 या आर्थिक वर्षातील चालू मागणीवरील महापालिकेच्या घरफाळयामध्ये 6 टक्के सवलत योजना लागू करण्यात आली असून, शहरातील सर्व मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 ही जमा मिळकतधारकांना महानगरपालिकेच्या कोणत्याही नागरी सुविधा केंद्रात जाऊन आपला करदाता क्रमांक सांगून चालू वर्षाचा घरफाळा भरता येणार असून, त्याद्वारे 6 टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम तसेच महानगरपालिकेच्या वेबसाईटद्वारेही ऑनलाईन घरफाळा भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ऑनलाईन कर भरण्यासाठी:propertytax.kolhapurcorporaction.gov.in या लिंकचा वापर करावा असे आवाहन घरफाळा विभागाने केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes