SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच नगरपालिकांमध्ये उत्स्फूर्त मतदान; ७८.८७ टक्के मतदानाची नोंद; मतमोजणी २१ डिसेंबर रोजी; गडहिंग्लज मधील एका जागेसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या तीन विद्यार्थ्यांची कोरियातील प्रतिष्ठित विद्यापीठांत संशोधनासाठी निवडकोल्हापुरात चाईल्ड हेल्पलाईनमुळे अल्पवयीन बालविवाह रोखलापंचगंगा घाटावरील रोष्णाईबाबत...कोल्हापूर जिल्हा नगरपालिका निवडणूक, सकाळी 7.30 ते 3.30 वाजेपर्यंत 61.99 % मतदानराज्यातील नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुक निकालाची कोर्टाकडून नवी तारीखतंबाखू मुक्त युवा अभियान ३.० अंतर्गत मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळेचे आयोजनकोल्हापूर जिल्हा नगरपालिका निवडणूक, सकाळी 7.30 ते 11.30 वाजेपर्यंत 28.12% मतदानकोल्हापुरातील हॉकी स्टेडियम मार्गावरील 'त्या' खुनाचा अवघ्या ६ तासात उलघडातरुणाईने योग्य मार्गाने माहिती मिळवल्यास एचआयव्ही पासून दूर राहणे शक्य : सिने कलाकार उमेश बोळके

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच नगरपालिकांमध्ये उत्स्फूर्त मतदान; ७८.८७ टक्के मतदानाची नोंद; मतमोजणी २१ डिसेंबर रोजी; गडहिंग्लज मधील एका जागेसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान

schedule03 Dec 25 person by visibility 55 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यातील १० नगरपरिषदा, ३ नगरपंचायतींमधील निवडणुकीत सर्व ३१८ मतदान केंद्रांवर उत्साहपूर्ण मतदान झाले. प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था चोख राखली असल्यामुळे ही प्रक्रिया शांततेने आणि सुरळीतपणे पार पडली. मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा, योग्य पोलिस बंदोबस्त आणि मनुष्यबळाचे योग्य नियोजन करून प्रशासनाने या निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्या. एकुण ३१८ मतदान केंद्रांवर २,५५,७३७ मतदारांपैकी २,०१,६८९ मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष १,००,१६८, महिला १,०१,५१२ तर इतर ९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा सहआयुक्त नगरप्रशासन नागेंद्र मुतकेकर यांच्या सनियंत्रणाखाली जिल्ह्यातील १० नगरपरिषदा, ३ नगरपंचायतींमधील निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या यशस्वी नियोजनातून निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सनियंत्रणाखाली व प्रत्येक ठिकाणी तैनात पोलीस अधिकारी, शिपाई यांच्या दक्षतेमुळे निर्विघ्न प्रक्रिया पार पडली.

नगरपालिकानिहाय मतदान आकडेवारी : जिल्ह्यातील १३ नगरपालिकांमध्ये १३ नगराध्यक्ष पदाच्या ५६ उमेदवारांसाठी व २६३ नगरसेवक पदांसाठीच्या ८ बिनविरोध जागा वगळता २५४ जागांवरील ८०० उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया पुर्ण झाली. गडहिंग्लज मधील एका जागेसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर सर्वच २५५ जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी एकत्रित २१ डिसेंबर रोजी होणार आहे.

🔸नगरपालिकेचे नाव, एकूण मतदार, झालेले मतदान व टक्केवारी पुढिल प्रमाणे,

🔸नगरपरिषद
▪️जयसिंगपूर – ४९७४७ पैकी ३४९२२ (७०.२०%),
▪️मुरगूड – १०१२८ पैकी ८९५६ (८८.४३%),
▪️मलकापूर – ४९३६ पैकी ४२९२ (८६.९९ %),
▪️वडगाव - २३०४४ पैकी १९८७३ (८६.२४%),
▪️गडहिंग्लज - ३०१६१ पैकी २२१८७ (७३.५६%),
▪️कागल – २८७५३ पैकी २३२३३ (८०.८०%),
▪️पन्हाळा - २९६७ पैकी २५१२ (८४.६६%),
▪️कुरुंदवाड - २२२२४ पैकी १८४३५ (८२.९५%),
▪️हुपरी - २४८०२ पैकी २००५२ (८०.८५%),
▪️शिरोळ - २४५३९ पैकी १९१९६ (७८.२३%)

🔸 नगरपंचायत
▪️आजरा -१४६८६ पैकी ११४३४ (७७.८६%),
▪️चंदगड - ८३१५ पैकी ६९९१ (८४.०८%)
▪️हातकणंगले - ११४३७ पैकी ९६०६ (८३.९९%) मतदान झाले.

◼️सोयीसुविधा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना
प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान यंत्र आणि मतदारांसाठी किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. विशेषतः महिलांसाठी आणि दिव्यांगांसाठी विशेष सोयीसुविधा पुरविण्यात आल्या. जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर केंद्राध्यक्ष, सहाय्यक, शिपाई आणि पोलिस कर्मचारी यांचा समर्पक बंदोबस्त करण्यात आला होता. यामुळे मतदान प्रक्रिया पूर्णपणे सुरळीतपणे पार पडली. मतदानाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्यासाठी पोलिस विभागाने कडक सुरक्षा व्यवस्था केली. तसेच, माध्यमांवर चुकीच्या बातम्या किंवा अफवा पसरू नयेत यासाठी सतर्कता बाळगली गेली.

◼️मतदार जागृती व प्रशासकीय यंत्रणा
मतदारांनी आपला मतदान हक्क निर्भयपणे आणि अचूकपणे बजावावा यासाठी त्या त्या निवडणूक प्रशासनाने व्यापक जागृती मोहीम राबवली. मतदान मार्गदर्शिका, मतदार यादीतील नाव शोधण्याची माहिती आणि वेबकास्टिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मनुष्यबळाचे नियोजन करताना आवश्यकतेनुसार राखीव कर्मचारी तैनात करण्यात आले. या सर्व घटकांचा समन्वय असलेल्या यशस्वी नियोजनामुळे जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका कायदा व सुव्यवस्थेच्या कोणत्याही उल्लंघनाविना उत्साहात आणि सुरळीत पार पडल्या.

◼️पिंक आणि आदर्श मतदान केंद्रांची उभारणी
मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि विशेषतः महिलांसाठी सुरक्षित व आकर्षक मतदान अनुभव देण्यासाठी पिंक मतदान केंद्रे आणि आदर्श मतदान केंद्रे १३ ही ठिकाणी उभारली गेली. या दोन्ही प्रकारच्या केंद्रांचा मुख्य उद्देश मतदान प्रक्रियेला अधिक समावेशक, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण बनवणे आहे. सामान्य केंद्रांपेक्षा अधिक आकर्षक आणि आरोग्यपूर्ण वातावरण तयार करून मतदारांना उत्साहपूर्ण मतदान करण्यास प्रोत्साहित केले गेले. मतदानाला उत्सवासारखे बनवून तरुण आणि सर्व वयोगटांना आकर्षित करुन, निवडणुका अधिक लोकाभिमुख आणि यशस्वी करीत मतदारांचा सक्रिय सहभागा मिळाला.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes