आजरा येथे अपघातात कोल्हापुरातील तरुण ठार
schedule20 Apr 25 person by visibility 609 categoryगुन्हे

कोल्हापूर : आंबोली आजरा रोडवरील मडलगे गावा जवळ झालेल्या कारच्या आणि स्पोर्टस् बाईक अपघातामध्ये कोल्हापुरातील तरुण ठार झाला सिध्देश विलास रेडेकर (वय 24.रा.कसबेकर पार्क,महावीर कॉलेज समोर,कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. स्पोर्टस् बाईक वरूनआपल्या मित्रा समवेत तो आजरा येथे सहलीला गेला होता.
सिध्देश याला स्पोर्टस् बाईक रायडींगचा छंद होता.आज सकाळी सहाच्या सुमारास आपल्या मित्रासह चौघेजण स्पोर्टस् बाईक वरून आजरा येथे गेले होते. ते परत येत असताना आंबोली आजरा रोडवर मडलगे गावा जवळ आले असता त्यांच्या बाईकची एका कारला जोराची धडक झाल्याने हेल्मेट घातलेल्या सिध्देश याचे हेल्मेट उडून डोक्यास मार लागल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला होता.जखमी सिध्देश याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.
त्याच्या अपघाताची माहिती समजताच त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्र परिवारांनी सीपीआर आवारात मोठी गर्दी केली होती.