कोल्हापूर जिल्हा सैनिक कल्याण संघटकांचा मासिक दौरा
schedule31 Oct 25 person by visibility 150 categoryराज्य
 
        कोल्हापूर : सर्व माजी सैनिक, विधवा, अवलंबितांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्याचबरोबर कल्याण व पुनर्वसनाच्या दृष्टीने योजना व सवलतीची माहिती देण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथील कल्याण संघटक यांचा नोव्हेंबर महिन्यामध्ये मासिक दौरा आयोजित केला आहे. संबंधित तालुक्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक, विधवा, अवलंबितांनी याचा लाभ घ्यावा.
जिल्हा सैनिक कल्याण संघटकांचा दौरा पुढीलप्रमाणे-
13 नोव्हेंबर दुसरा गुरुवार, तहसिल कार्यालय, गडहिंग्लज, 20 नोव्हेंबर तिसरा गुरुवार,  तहसिल कार्यालय, शाहुवाडी, 26 नोव्हेंबर चौथा बुधवार, तहसिल कार्यालय भुदरगड (गारगोटी), 28 नोव्हेंबर चौथा शुक्रवार तहसिल कार्यालय, आजरा येथे होणार आहे. 
तहसिलदार यांच्या कार्यालयातील सर्व दौरे निर्देशित ठिकाणी होतील. या दिवशी शासकीय किंवा इतर सुट्टी असल्यास त्या तालुक्याचा दौरा पुढील महिन्यात घेण्यात येईल, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत पत्रकाव्दारे कळविण्यात आले.
 
                     
 
 
 
