शिवाजी विद्यापीठामध्ये सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांना अभिवादन
schedule31 Oct 25 person by visibility 99 categoryसामाजिक
 
        कोल्हापूर : भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन या निमित्ताने या महान नेत्यांच्या स्मृतींना आज शिवाजी विद्यापीठात अभिवादन करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासीय इमारतीमध्ये आज सकाळी सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर, सर्व उपस्थितांना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एकता व सद्भावना यांची शपथ देण्यात आली.
यावेळी वित्त व लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागप्रमुख डॉ.श्रीकृष्ण महाजन, क्रीडा संचालक डॉ.शरद बनसोडे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.तानाजी चौगुले, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ.रामचंद्र पवार, स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँंड टेक्नॉलॉजीचे प्र.संचालक डॉ.किरण कुमार शर्मा, डॉ.क्रांतीवीर मोरे, डॉ.राहूल माने, डॉ.सुभाष कोंबडे, उपकुलसचिव डॉ.प्रमोद पांडव, श्रीमती संध्या अडसुळ, डॉ.प्रमोद पाटील, डॉ.तुकाराम डोंगळे, डॉ.मुकेश पाडवी, डॉ.किरण पवार, डॉ.सुनिलकुमार निर्मळे, डॉ.योजना पाटील, डॉ.तेजस्वीनी भट, डॉ.सुर्यबाला सावंत, डॉ.मेघा देसाई, डॉ.कृष्णा पवार, डॉ.अखिलेश पाटील यांच्यासह अधिविभागाचे शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.
 
                     
 
 
 
