SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठामध्ये सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांना अभिवादनजोखीम गटातील व्यक्तींच्या एचआयव्ही तपासण्या प्राधान्याने कराव्यात; जिल्हा एड्स प्रतिबंध समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचनादुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका 6 नोव्हेंबरपासून सुरुआधुनिक दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांचा विकास साधण्याचा ‘गोकुळ’चा निर्धार : नविद मुश्रीफ२०१ दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम अवयवांचे वाटप; सावली केअर सेंटर आणि भारत विकास परिषदेचा संयुक्त उपक्रमकोल्हापूर : ॲटो रिक्षा चोरणारे दोन ताब्यात; २४ तासात चोरीचा गुन्हा उघडप्रगतीसाठी स्वतःची जागरूकता आणि तर्कशुद्ध विचारसरणी अत्यंत महत्त्वाची : सोहम तिवाडे; केआयटी मध्ये सोसायटी वुमेन इंजिनिअर्स च्या वतीने वादविवाद स्पर्धेचे आयोजनजिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार देण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसॲट्रॉसिटी अंतर्गत विहित वेळेत दोषारोप पत्र दाखल करावीत : जिल्हाधिकारी अमोल येडगेकोल्हापूर जिल्हा सैनिक कल्याण संघटकांचा मासिक दौरा

जाहिरात

 

दुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका 6 नोव्हेंबरपासून सुरु

schedule31 Oct 25 person by visibility 154 categoryराज्य

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन दुचाकी नोंदणी मालिका MH09-HC दि. 6 नोव्हेंबर पासून सुरु करण्यात येत असून संबंधित वाहन चालकांच्या पसंती क्रमांकाचे अर्ज 6 व 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 3 या वेळेत खिडकी क्र. 9 येथे स्विकारण्यात येतील, अशी माहिती सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली.

पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत शासनाने विहित केलेल्या शुल्कानुसार त्या क्रमांकासाठी विहित असलेल्या मुळ रकमेचा Demand Draft (धनाकर्ष) जोडलेला असणे आवश्यक आहे. धनादेश किंवा पे ऑर्डर अर्जासोबत देवू नये. Demand Draft (धनाकर्ष) काढताना SBI TRE. BRANCH KOLHAPUR GRAS या नावानेच काढलेला असावा. इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्विकारला जाणार नाही. पसंतीच्या क्रमांकाच्या मूळ रकमेचा एकच Demand Draft (धनाकर्ष) 6 व 7 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 3 या वेळेत कार्यालयात सादर करावा. 7 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजले नंतर पसंतीच्या क्रमांकाच्या सिंगल डी.डी. व लिलावात गेलेल्या क्रमांकाच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील.

धनाकर्षाच्या मागे अर्जदाराने नाव, मोटार वाहनाचा प्रकार, मागणी केलेला नोंदणी क्रमांक व आधार लिंक मोबाईल क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेस त्या क्रमांकाचा लिलाव करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने 10 नोव्हेंबर रोजी जादा रकमेचा एकच स्वतंत्र Demand Draft (धनाकर्ष) बंद लिफाफ्यात सकाळी 9.45 ते दुपारी 2.30 या कालावधीत जमा करणे बंधनकारक राहील. एकपेक्षा जास्त अर्ज असलेल्या नोंदणी क्रमांकाचा लिलाव 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात येईल. फक्त अर्जदार व प्राधिकृत प्रतिनिधी यांनाच लिलावास उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येईल व लिलावास येताना अर्जदाराने ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच प्राधिकृत प्रतिनिधी राहणार असल्यास त्यांच्याकडे प्राधिकारपत्रासह ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. आकर्षक क्रमांकाची मागणी करताना आधारला संलग्न असलेलाच मोबाईल नंबर व पत्ता अर्जावर लिहावा, अर्जावर मोबाईल नंबर लिहला नसल्यास कोणताही हक्क आकर्षक क्रमांकावर राहणार नाही. तसेच यादीमध्ये संबंधिताचे नाव आले तरी त्यांना आकर्षक क्रमांक मिळणार नाही.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येत नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 180 दिवसाच्या आत नोंदणी करुन नाही घेतली किंवा मालिका संपल्यानंतर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकारजमा होईल. विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नाही.  वैयक्तिक अर्ज व आकर्षक क्रमांकाच्या फी चा धनाकर्ष वाहनधारकाने फीची खात्री करूनच जमा करावा जरी नजर चुकीने धनाकर्ष घेतला गेला व नंतर पडताळणी करताना कार्यालयाच्या निदर्शनास आले तर लिलाव प्रक्रियेत अर्ज बाद करणेत येईल याची नोंद घ्यावी.

लिलाव प्रकरणी दुसरा डी.डी. सादर करताना मूळ रकमेचा जमा डी.डी. व दुसऱ्यांदा सादर केलेल्या डी.डी.ची रक्कम एकत्रित करुन जादा रक्कम देणाऱ्यास क्रमांक देण्यात येईल. लिलाव प्रकरणी दुसऱ्यावेळीही समान रक्कमेचा डी.ङी. आल्यास किंवा दुसऱ्या वेळी डी.डी. सादर न झालेस ज्या व्यक्तीने पहिल्यावेळी प्रथम डी.डी. सादर केला असेल त्याला हा क्रमांक देण्यात येईल. लिलावातील जादा रकमेचा एकच डीडी स्वीकारण्यात येईल. लिलाव प्रकरणी दुसऱ्यावेळीही समान रक्कमेचा डीडी आल्यास किंवा दुसऱ्या वेळी डीडी सादर न झाल्यास ज्या व्यक्तीने पहिल्यावेळी प्रथम डीडी सादर केला असेल त्याला हा क्रमांक देण्यात येईल. सध्या सुरु असलेली दुचाकी वाहन मालिका HB मधील उर्वरित क्रमांक संपल्यानंतर नवीन मालिका HC फॅन्सी नंबर पोर्टलवर प्रदर्शित करण्यात येईल.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes