SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात तिरंगा पदयात्रा उत्साहात नवीन क्रिकेट मैदानासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला मदत करु : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; वानखेडे मैदानावरील भव्य सोहळ्यात स्टँडला रोहित शर्मा यांचे नावगुडाळ येथील स्वर्गीय इंदिरा पाटील दूध संस्थेच्या पदाधिकार्‍यांसह प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश, खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून स्वागतहिंगोली येथील फरार आरोपी व साथीदाराकडून आंतरजिल्ह्यातील चोरीच्या 8 मोटर सायकली जप्तनिवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहावे नेपाळ येथील स्पर्धेत जानवी लोढाचे दुहेरी यश श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅटट्रिक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाची भारतीय गुणवत्ता परिषदे मार्फत तपासणीगोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न सामंजशाने सुटेल; आमदार सतेज पाटील...अन्यथा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकू; आमदार सतेज पाटील यांचा इशारा

जाहिरात

 

बहुचर्चित अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण : मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप

schedule21 Apr 25 person by visibility 276 categoryगुन्हे

मुंबई : सहाय्यक पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांची २०१६ मध्ये हत्या झाली होती. याबाबत पनवेल सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती याप्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच २० हजारांचा दंडही सुनावण्यात आला आहे. तर या प्रकरणातील इतर दोन आरोपी म्हणजेच कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या दोन आरोपींना प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  ९ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे.

बहुचर्चित पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे अपहरण आणि हत्या प्रकरणात बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मुख्य आरोपी असल्याचंच समोर आले. तर महेश फळणीकर आणि कुंदनलाल भंडारी यांना पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोषी जाहीर करण्यात आले. मात्र याप्रकरणातील दोन क्रमांकाचा आरोपी ज्ञानदेव उर्फ राजू पाटील याला पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आले. 

अश्विनी बिद्रे  यांची २०१५ मध्ये नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात बदली झाली होती. मात्र त्या कळंबोली पोलीस ठाण्यात रुजू झाल्याच नव्हत्या. दीड वर्षांपासून त्या बेपत्ता होत्या. अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी कळंबोली पोलीस ठाण्यात अभय कुरुंदकर यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिसांनी कुरुंदकर यांच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. यामुळे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले होते. 

११ एप्रिल २०१६ रोजी अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याची बाब उघड झाली. अनैतिक प्रेमसंबंधातून ही हत्या करण्यात आली. या प्रकरणात भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्याचा तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मुख्य आरोपी होता. अश्विनी बिद्रे यांची हत्या करून आपल्या साथादीरांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. या याप्रकरणी अभय कुरुंदकर, ज्ञानदेव पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना अटक करण्यात आली. दरम्यान पनवेल सत्र न्यायालयाने आज  निकाल दिला आहे .

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes