SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘गरुड दृष्टी’ सोशल मिडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्सच्या मदतीने तब्बल 10 कोटी रुपये संबंधीत लोकांना परतनागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ; नगर-पुणे रेल्वे मार्गासाठी प्रयत्न : मुख्यमंत्रीकारागृहातील वाचनसंस्कृतीस चालना; बंदिवानांसाठी वाचनाची नवी संधीउत्कृष्ट पशुपालक, स्वच्छ व सुंदर गोठा अभियानाचा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सोमवारी प्रारंभ 'गोकुळ’ कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात; सभासदांना ८% लाभांश जाहीरस्मॅक आयटीआयचे गुणवंत विद्यार्थी ठरले महापारेषणसाठी योग्य !संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला एसडीजी फोकस एज्युकेशनल एक्सलन्स'' पुरस्कार रक्षाबंधनाचा स्नेह, सामाजिक बांधिलकीचा मातोश्री फौंडेशनचा सामाजिक उपक्रमपर्यावरण पूरक रक्षाबंधनकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची दि.११ व १२ ऑगस्ट रोजी संवर्धन प्रक्रिया; कलश व उत्सव मूर्तीच्या दर्शनाची व्यवस्था

जाहिरात

 

कोल्हापूर ते नंदवाळ आषाढी वारीचे 29 जून रोजी आयोजन; 245 गावातील वारकरी सहभागी होणार; 28 जून रोजी नगर प्रदक्षिणा आयोजन

schedule22 Jun 23 person by visibility 376 categoryसामाजिक

कोल्हापूर : प्रति पंढरपूर नंदवाळ या कोल्हापूरहून 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या विठ्ठल मंदिरात आषाढी वारीत कोल्हापूर जिल्ह्यासह निपाणी–बेळगांव– खानापूर–सांगली परिसरातील 200 हून अधिक गावातील पन्नास हजार वारकरी बंधू-भगिनी सहभागी होतील. गुरुवार 29 जुन रोजी सकाळी साडेसात वाजता विठ्ठल मंदीर, मिरजकर तिकटी येथुन ही दिंडी सुरु होईल. पुईखडी येथे वारी प्रमाणे रिंगण सोहळा संपन्न होणार आहे. तर पुर्वसंध्येला बुधवार 3 वाजता 28 जून रोजी नाथा गोळे तालीम मंडळ चौक येथून विठ्ठल मंदिर मार्गे नगर प्रदक्षिणा संपन्न होणार आहे. या दोन दिवसाचा लाभ समस्त विठ्ठल भक्तांनी सहभागी होवून घ्यावा असे आवाहन संयोजक श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळाचेवतीने ह.भ.प. दिंडी प्रमुख लाड महाराज, दिपक गौड व संयोजक अध्यक्ष बाळासो पोवार यांनी केले आहे.

आषाढी यात्रेच्या सुरवातीस बुधवार 28 जून रोजी पहाटे विठ्ठल मंदिरात पूजा व अभिषेक सचिन चव्हाण व जयश्री चव्हाण यांचे हस्ते होणार आहे. तसेच भव्य नगर प्रदक्षिणा दुपारी तीन वाजता नाथागोळे तालीम चौक जय शिवराय तरूण मंडळ येथून माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होईल. यामध्ये महाराष्ट्र ढोल पथक, वारकरी व टाळकरी यांच्यासह पारंपारीक वांद्याचा समावेश असेल. या माऊलींच्या पालखीचे प्रस्थान मा. जिल्हाधिकारी श्री. राहुल रेखावार, कु. पुष्कराज राजेश क्षीरसागर, जुना राजवाडा पीआय. श्री. सतिशकुमार गुरव यांच्या हस्ते संपन्न होईल.

दुपारी चार वाजता विठ्ठल मंदिर, मिरजकर तिकटी येथे आरती होऊन नगरप्रदक्षिणेस प्रारंभ होईल यामध्ये वैशाली राजेश क्षीरसागर सिध्दी गणेश रांगणेकर, रंजना राजेंद्र जाधव, संगिता अजित चव्हाण, यांचा समावेश असेल.

 विठ्ठल मंदिर, मिरजकर तिकटी– महाव्दार रोड–भवानी मंडपातील उभ्या रिंगण सोहळ्यासह ही दिंडी मिरजकर तिकटीहून टिंबर मार्केट येथील सासने इस्टेट येथे विसाव्यास जाईल. येथे सर्व वारकरी बंधूना श्रीमती शिलावती बाळासाहेब सासने व परिवाराच्यावतीने महाप्रसाद देण्यात येणार आहे. यावेळी सहभागी वारकरी बंधु -भगिनींची आरोग्य तपासणी पंत वालावलकर हॉस्पिटल यांच्या वतीने केली जाणार आहे. या मुक्कामाच्या ठिकाणी ह.भ.प. एम. पी. पाटील यांचे प्रवचन आणि दिंडी प्रमुख आनंदराव लाड महाराज यांचे किर्तन होणार आहे. करवीर तालुक्यातील कांडगांवच्या आठ बैलजोड्या सलग 19 वर्षीही सहभागी होत आहेत. तसेच मोरेवाडीतील संतोष रांगोळे यांचे दोन अश्वही रिंगण सोहळ्यात दिंडीत सहभागी असणार आहेत. कळंबा येथील भगवान शामराव तिवले हे चोपदार म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.

🔴 गुरुवार दि. 29 जून रोजी सकळी दिंडीचे नंदवाळकडे प्रस्थान
🔸️खंडोबा तालीम येथे बेल, भंडाऱ्याने स्वागत
आषाढी दिनी गुरुवार दि. 29 जून रोजी सकाळी 7.30 वा. मिरजकर तिकटी विठ्ठल मंदीर येथे ऋुतूराज राजेश क्षीरसागर, मारुती पांडुरंग बाऊस्कर व सुहास सोरटे यांच्या हस्ते आरती व पालखी पूजन करून नंदवाळकडे दिंडी प्रस्थान करेल. शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम व खंडोबा देवालय यांच्यातर्फे माऊलींच्या पालखीवर बेल, भंडारा व फुलांची उधळण खंडोबा तालमीच्या वतीने अश्व पूजन करुन उभे रिंगण पार पडेल व पालखी पुईखडीला मार्गस्थ होईल.

 पुईखडी येथे वारी प्रमाणे रिंगण सोहळ्याचे व विसाव्याचे नियोजन माजी नगरसेवक शारंगधर देशमुख व एकजुटी तरुण मंडळ, विघ्नहर्ता भजनी मंडळ, राधेय ग्रुप, सानेगुरुजी वसाहत करीत आहे. रिंगण सोहळ्याचे व माऊली अश्वाचे पूजन राजेश क्षीरसागर, आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, अरुण डोंगळे, पी. एन. पाटील, चंद्रदीप नरके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. 

या सर्व कार्यक्रमाचे नियोजनासाठी श्री. ज्ञानेवश्वर माऊली पालखी सोहळ्याचे विश्वस्त अध्यक्ष बाळासो पोवार, अजित रामभाऊ चव्हाण, उपाध्यक्ष दिपक गौड, समन्वयक राजेंद्र मकोटे, सखाराम चव्हाण, दास महाराज, बाळासाहेब गुरव, एम. पी. पाटील, भगवान तिवले, संभाजी पाटील कांडगावकर, संतोष कुलकर्णी, ॲड. राजेंद्र किंकर, विष्णू पोवार यांच्यासह जय शिवराय तरुण मंडळ नियोजन करीत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes