कोल्हापूरमध्ये रंगपंचमी उत्साहात; तरुणाईचा जल्लोष
schedule19 Mar 25 person by visibility 207 categoryसामाजिक

कोल्हापूर : होलीका दहनाच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. यंदा रंगपंचमी 19 मार्चला साजरी करण्यात आली आहे. धार्मिक मान्यतेनुसार, रंगपंचमीच्या दिवशी एकामेकांवर रंग- गुलालाची उधळण केली जाते. रंगपंचमीच्या दिवशी मित्र- परिवार, नातेवाईक गुलाल आणि विविध रंग लावून रंगपंचमी साजरी करतात. राज्यात रंगपंचमीचा सण उत्साहाने साजरा करण्यात आला.
कोल्हापूरमध्ये रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळला. कोल्हापूरमधील विविध पेठा आणि गल्लीबोळामध्ये हा सण साजरा होत आहे. त्यामध्ये तरुणाईचा मोठ्या प्रमाणात समावेश असून एकामेकांना रंग लावून रंगपंचमीचा सण साजरा करत आहे. यामध्ये कोरडे रंग तसेच नैसर्गिक रंग पाण्याचा वापर करण्यात आला तर तरुणाईने संगीताच्या तालावर नृत्याचा ठेका धरत जल्लोषामध्ये रंगपंचमी साजरी केली.
▪️रंगपंचमी अनुषंगाने वाहतूक शाखेची कारवाई
रंगपंचमी अनुषंगाने आज पोलीस अधीक्षक कोल्हापूर,अपर पोलीस अधीक्षक कोल्हापूर व उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहरामध्ये 31 ठिकाणी शहर वाहतूक शाखेमार्फत कारवाई करण्यात आली. यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणे 20 केसेस, ट्रिपल सीट 181 केसेस, वाहन चालवताना मोबाईल वर बोलणे 42 केसेस,सायलेन्सर 08 केसेस व इतर 308 केसेस अशा एकूण 559 वाहनचालकांच्यावर कारवाई करण्यात आली व रुपये 426500/- इतका दंड आकारण्यात आला हे कारवाई सायंकाळपर्यंत करण्यात आली होती त्यानंतर ही कारवाई सुरू होती. अशी माहिती शहर वाहतूक शाखा कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली आहे.