SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राधानगरी धरणाचे तीन दरवाजे उघडलेमाजी सैनिक सुरक्षा रक्षकांचा थकीत वेतन फरक विद्यापीठ फंडातून द्या; आमदार सतेज पाटील यांची उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणीकाँग्रेसचा मेळावा यशस्वी करूया; माजी नगरसेवकांच्या बैठकीत निर्धारराज्यात सहा जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट परिसरात रेड अलर्ट ॲट्रॉसिटी कायद्याबाबत जनजागृतीसाठी कार्यशाळा घ्या: जिल्हाधिकारी अमोल येडगेई वॉर्डचा पाणी पुरवठा राहणार बंदराज्यातील धोकादायक शाळा इमारतींचे सर्वेक्षण करावे : शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयरडॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकला भारत सरकारकडून पेटंटटॉप २०० मध्ये घोडावत विद्यापीठ; स्वयंम-एनपीटीईएल अ‍ॅक्टिव्ह लोकल चॅप्टर्स तर्फे 'A' श्रेणी कोरे अभियांत्रिकीचे तसेच एमबीए, एमसीए प्रवेश यावर्षी वारणा विद्यापीठामधून; महाराष्ट्रातील पहिले राज्य सार्वजनिक समूह विद्यापीठ

जाहिरात

 

संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान हे चालते बोलते विद्यापीठ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

schedule24 Jul 25 person by visibility 253 categoryराज्य

▪️उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्री भक्त शिरोमणी नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित

सोलापूर : संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान हे चालते बोलते विद्यापीठ आहे. संत नामदेव महाराज यांनी भागवत धर्माची पताका महाराष्ट्र बाहेर नेली, रुजवली व वाढवली. त्यामुळे वारकऱ्यांना देशभर प्रतिष्ठा आहे. तसेच वारीच्या माध्यमातून देशभरातून लाखो भाविक पंढरपूरात येतात आणि त्यांच्या सुख, समृद्धी व सेवेसाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई यांच्या षष्ठशतकोत्तर (675 वा) संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराज यांच्या वंशजांकडून  संत नामदेव महाराज मंदिर येथे प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी आमदार समाधान आवताडे, अभिजीत पाटील, उत्तम जानकर, माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार जयवंत जगताप, सकल संत वंशज तथा संत समाधी संस्थान प्रमुख, विश्वस्त, फडकरी, जेष्ठ कीर्तनकार मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संत नामदेव महाराजांच्या जन्मभूमीवर पुरस्कार मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. तसेच हा पुरस्कार वैयक्तिक सन्मान मानण्याऐवजी सहकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ म्हणून स्वीकारल्याची भावना व्यक्त केली. हा पुरस्कार कोणत्याही पदापेक्षा मोठा असल्याचे त्यांनी म्हटले.

शेतकरी व वारकरी यांचा विकास हे प्राधान्य असून संत नामदेवांच्या शिकवणीप्रमाणे तळागाळातील प्रत्येकाचा सर्वांगीण विकास अपेक्षित आहे. शासन धार्मिक अधिष्ठानास राजकीय अधिष्ठानापेक्षा प्राधान्य देत असून, महाराष्ट्रातील तमाम साधू-संतांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे, असेही  शिंदे यांनी यावेळी सांगितले. इतिहासात प्रथमच वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी शासनाने अनुदान जाहीर केले असून विमा सुरक्षा, आरोग्य तपासणी शिबिरे, शुद्ध पाणी, निवास, स्वच्छता इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हा सगळा विकास लोकांना विश्वासात घेऊन आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

अक्षय महाराज भोसले यांनी प्रास्ताविक केले यामध्ये त्यांनी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज व त्यांचे वंशज यांच्या परंपरेंची व कार्याची माहिती दिली तसेच हा पुरस्कार देण्यामागचा उद्देश सांगितला. यावेळी ह. भ.प. चैतन्य महारज देगलूरकर, राणा महाराज वासकर यांनी आपले विचार व्यक्त केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes