'हिम्मत असेल तर आबिटकरांच्या घरावर मोर्चा घेऊन जावा'; के. पी. पाटलांना सतेज पाटलांचे खुले आव्हान
schedule29 Nov 26 person by visibility 191 categoryराजकीय
कोल्हापूर : सत्ताधारी गटातील नेत्यांची भूमिका आत एक आणि बाहेर एक अशी आहे. माजी आमदार के. पी. पाटील यांच्यात हिम्मत व दम असेल, तर त्यांनी थेट सत्तेत बसलेल्या उपमुख्यमंत्र्यांसमोर बोलावे आणि केवळ पत्रकबाजी न करता उद्या सकाळी मंत्री प्रकाश आबिटकरांच्या घरावर मोर्चा घेऊन जावा, असे थेट आव्हान आमदार सतेज पाटील यांनी दिले आहे .
प्रतिक्रिया व्यक्त करताना सतेज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली ते म्हणाले की, संबंधित तिघेही नेते सत्तेत आहेत. तिथे जाऊन त्यांनी थेट बोलावे आणि सत्तेची ताकद वापरून ते थांबवावे. केवळ पत्रके काढून, बोलून आणि 'टीआरपी' मिळवण्याचे काम चालणार नाही, असे त्यांनी ठणकावले .
के. पी. पाटील यांना उद्देशून सतेज पाटील म्हणाले की, केवळ प्रसिद्धीसाठी घोषणा देऊ नका; हिम्मत असेल तर रस्त्यावर उतरा आणि उद्या सकाळी त्यांच्या घरावर मोर्चा काढा. असे केल्यास तुम्ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या बरोबर आहात, हे आम्हाला दिसून येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.