सिम्बॉलिक स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के
schedule14 May 25 person by visibility 498 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील सीबीएसई मान्यताप्राप्त सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला.
स्कूलचे गुणानुक्रमे पहिले विद्यार्थी असे (कंसात गुण): अमेय शिवप्रसाद उगळे ( ९५), आयुष्यमान बिस्वाल ( ९२), अथर्व राकेश मोरे व शिल्पा शरद पाटील (९१). शाळेतील सर्वच विद्यार्थी विशेष प्राविण्यसह पास झाले आहेत.
विद्यार्थ्यांना शाळेच्या संस्थापिका गीता पाटील, उपमुख्याध्यापिका तरन्नूम मुल्ला यांचे मार्गदर्शन तर प्रशासक अधिकारी म्रिनाल पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.