SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा राजीनामातर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचारकार्यावर शिवाजी विद्यापीठात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदकरवीर काशी च्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन विशेषांकाचे थाटात प्रकाशनपन्हाळा किल्ला जगाच्या नकाशावर : जिल्हाधिकारी अमोल येडगे; युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळा किल्ल्याची नोंदशिवकालीन १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन; महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण; ऐतिहासिक दुर्गसंपदेला जागतिक ओळखप्राथमिक तपासणी करून मतदान यंत्र सज्ज ठेवावीत : राज्य निवडणूक आयुक्तविद्यार्थ्यांना रोजगार संधींच्या दृष्टीने ‘एईडीपी’ उपयुक्त: डॉ. एन.एन. वडोदे; शिवाजी विद्यापीठात एकदिवसीय विशेष कार्यशाळाराज्यातील कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी, शासनाने कोणत्या उपाययोजना आखल्या : आमदार सतेज पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज परताव्याबाबत आमदार सतेज पाटील यांचा विधिमंडळात प्रश्न ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाकडे सभासद नोंदणी करा

जाहिरात

 

कोल्हापुरातील धोकादायक इमारतींवर कारवाई करा : प्रशासक के.मंजूलक्ष्मी

schedule08 Jul 24 person by visibility 495 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : पंचगंगा नदीची पाणी पातळी सतत वाढत असल्याने संभाव्य पूरस्थितीच्या पाश्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या तयारीचा आढावा सोमवारी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी घेतला. यावेळी धोकादायक इमारतीवर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासकांनी सर्व उपशहर अभियंता यांना दिल्या. तसेच उद्यान विभागाने धोकादायक झाडांची यादीची ट्री कमिटीची मान्यता घेऊन अशा धोकदायक झाडांच्या फांदया लवकरात लवकर छाटणीच्या सूचना दिल्या. ही आढावा बैठक महापालिकेच्या आयुक्त कार्यालयात सकाळी घेण्यात आली.

 प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी यावेळी उप-शहर अभियंता यांनी स्थलांतरीतांच्या निवा-याची, त्या ठिकाणी सर्व सोयी-सुविधेची पडताळणी करा. विभागीय कार्यालय क्षेत्रातील धोकादायक इमारतींची आज पुन्हा पाहणी करुन इमारतींचा धोकादाय भाग उतरून घेण्याच्या सूचना सर्व उप-शहर अभियंता यांना दिल्या. संभाव्य पूर परिस्थितीच्या कालावधीत सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी आपले फोन सुरु ठेवावेत. पुढील दोन महिने परवानगी न घेता कोणीही रजेवर जाऊ नये. रजेवर जायाचे झालेस पूर्व परवानगी घेऊनच रजेवर जाणेच्या सूचना दिल्या. आरोग्य विभागाने औषधाचा पूरेसा साठा करुन ठेवावा, डेंग्युच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्‍ यंत्रणेने सर्व्हे वाढविण्याच्या सूचना आरोग्याधिकारी यांना दिल्या. वर्कशॉप विभागाने सर्व वाहनावर तीन शिफ्टमध्ये ड्रायव्हरांची डयुटी लावून रात्रीच्यावेळीही सर्व यंत्रणा सज्य ठेवण्याचे आदेश त्यांनी सहा.आयुक्तांना दिले. अग्निशमन विभागाने त्यांच्याकडील सर्व साधन सामुग्री सज्ज ठेवावी. या विभागास रात्रीच्यावेळी पडलेली झाडे उचलण्यासाठी स्वतंत्र जेसीबी व डंपर देण्याच्या सचूना वर्कशॉप विभाग प्रमुखांना दिल्या. शहरात जी बांधकामे सुरु आहेत त्यांची खरमाती, वाळू व इतर साहित्‍य रस्त्यावर पडले असते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अशा बांधकामांवर दंडात्मक कारवाई करावी. यासाठी नगरचना, विभागीय कार्यालय व आरोग्य विभागाने समन्वय ठेऊन कारवाई करावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

  यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उप-आयुक्त पंडीत पाटील, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, संजय सरनाईक, मुख्य लेखा परीक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर अभियंता सतीश फप्पे, आर.के.पाटील, रमेश कांबळे, महादेव फुलारी, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, इस्टेट ऑफिसर विलास साळोंखे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, वर्कशॉप प्रमुख विजयसिंह दाभाडे, सहा.अभियंता अमित दळवी, नोडल ऑफिसर डॉ.अमोल माने आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes