बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षणाच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
schedule23 Jul 25 person by visibility 218 categoryदेश

▪️कोणताही पात्र मतदार वगळला जाणार नाही, आणि कोणताही अपात्र व्यक्ती समाविष्ट होणार नाही – भारत निवडणूक आयोगाचा उद्देश
मुंबई : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे की, बिहार राज्यात 24 जून 2025 पासून सुरू झालेल्या विशेष पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
🔴 या टप्प्यात खालील बाबी स्पष्ट झाल्या आहेत :
▪️९८.०१% मतदारांचा कव्हरेज पूर्ण;
▪️२० लाख मृत मतदारांची नोंद;
▪️२८ लाख कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार;
▪️७ लाख मतदार दोन ठिकाणी नोंदलेले आढळले;
▪️१ लाख मतदार अपात्र किंवा शोधता न आलेले;
▪️१५ लाख मतदारांनी आपले फॉर्म परत केलेले नाहीत आणि
▪️७.१७ कोटी (९०.८९%) मतदार फॉर्म प्राप्त आणि डिजिटल स्वरूपात रूपांतरित
▪️राज्यातील १२ प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी नियुक्त केलेल्या सुमारे १.५ लाख बूथ लेव्हल एजंट्स (BLA) यांना २० जुलै रोजी चुकून समाविष्ट केलेल्या मतदारांची आणि फॉर्म न भरलेल्या मतदारांची यादी देण्यात आली आहे.
बिहारमधून तात्पुरते स्थलांतरित झालेले, पण इतरत्र नोंदणी न केलेले मतदार खालील पद्धतीने फॉर्म भरू शकतात :
https://electors.eci.gov.in किंवा ECINet मोबाईल ॲपवर ऑनलाइन अर्ज भरून किंवा छापील फॉर्म भरून व स्वाक्षरी करून कुटुंबीयांच्या माध्यमातून बीएलओ (BLO) कडे पाठवू शकतात किंवा छापील अर्ज भरून व स्वाक्षरी करून व्हॉट्सॲपवर बीएलओ च्या मोबाईलवर पाठवू शकतात.
हा अर्ज सादर केलेल्या मतदारांची नावे मसुदा मतदार यादीत समाविष्ट केली जातील. याची पुष्टी व माहिती https://electors.eci.gov.in/home/enumFormTrack# या संकेतस्थळावर करता येईल. फॉर्म भरलेल्या आणि मोबाइल क्रमांक नमूद केलेल्या मतदारांना आयोगाकडून एसएमएस (SMS) संदेश पाठविण्यात आले आहेत.
१ ऑगस्ट २०२५ रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. जर या यादीत काही त्रुटी आढळल्या, तर कोणत्याही मतदाराला किंवा राजकीय पक्षाला १ सप्टेंबर २०२५ पर्यंत आपत्ती नोंदवता येईल. तसेच, कोणत्याही पात्र व्यक्तीचे नाव यादीत न आढळल्यास त्यांनी दावा दाखल करता येईल, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.