सैनिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत माजी सैनिक मेळावा
schedule24 Jul 25 person by visibility 232 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांच्या अडीअडचणी, तक्रार निवारणासाठी दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत महासैनिक दरबार हॉल, कोल्हापूर येथे आजी-माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व आजी-माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता-पिता, माजी सैनिक विधवा यांनी आपल्या तक्रारी, अडचणींचे अर्ज, निवेदन दिनांक 31 जुलै 2025 पुर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे सादर करावेत,
असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल (डॉ.) भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.