वाहने चोरणारा गजाआड; ११० हुन अधिक गुन्हे दाखल
schedule02 May 25 person by visibility 319 categoryगुन्हे

कोल्हापूर : " विविध जिल्हयामध्ये जावुन वाहने चोरणाऱ्या एकास अटक करण्यात आली त्याच्याकडून ८,६०,५००/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने ही कामगिरी केली.
रेकॉर्डवरील गुन्हेगार नागेश शिंदे रा. कोरोची याने राजारामपुरी येथुन एक दुचाकी मोटर सायकल चोरी केली असुन ती मोटर सायकल विक्रीकरीता गोकुळ शिरगाव कमानीजवळ येणार आहे, अशी गोपनीय बातमी मिळाली असता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गोकुळ शिरगाव येथे जावून गोकुळ शिरगाव कमानीजवळ चारही बाजुला सापळा रचुन छापा कारवाई केली त्यामध्ये नागेश शिंदे याचे कब्जात दुचाकी पेंशन प्लस मोटर सायकल मिळुन आली त्याचेकडे गाडीचे मालकीबाबत विचारणा केली असता त्याने समर्पक उत्तर दिले नाही. त्यानंतर अधिक कसुन चौकशी केली असता त्याने सदरची मोटर सायकल ही आपण राजारामपुरी येथुन चोरी केली आहे. तसेच पंढरपुर येथुन एक बोलेरो पिकअप गाडी व सांगोला येथुन एक वॅगन आर चारचाकी गाडी चोरी केलेची कबुली दिली आहे. त्याबाबत संबधीत राजारापुरी पोलीस ठाणे येथे दुचाकी चोरीबाबत, पंढरपुर येथे बोलेरो पिकअप चोरीबाबत व सांगोला येथे वॅगन आर ही गाडी चोरी झालेबाबतचे गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
आरोपी नागेश हणमंत शिदे वय ३० यांचेवर यापुर्वी वेगवेगळ्या जिल्हयामध्ये वाहन चोरी व इतर चोरीचे ११० हुन अधिक गुन्हे दाखल आहेत.
आरोपी नागेश हणमंत शिंदे वय ३० रा कोरोची ता हातकंणगले जि कोल्हापूर यांचेकडे मिळुन आलेली बोलेरो पिकअप, वॅगन आर चारचाकी गाडी व हिरोहोंडा पेंशन प्लस दुचाकी मोटरसायकल व गुन्हयातील इतर मुददेमाल असा एकुण ८,६०,५००/- रुपये किंमतीचा मुददेमाल कायदेशिर प्रक्रीया करून जप्त केला आहे. आरोपी नागेश हणमंत शिंदे वय ३० रा कोरोची ता हातकणंगले जि कोल्हापुर यास गुन्ह्याचे पुढील तपासकामी राजारामपुरी पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक , निकेश खाटमोडे पाटील, अपर पोलीस अधीक्षक , डॉ. बी धीरजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक संतोष गळवे, पोलीस अमंलदार वैभव पाटील, विशाल खराडे, गजानन गुरव, हिंदुराव केसरे, प्रदीप पाटील, अरविंद पाटील, संतोष बरगे, योगेश गोसावी, महेंद्र कोरवी, परशुराम गुजरे, शिवानंद मठपती, सचिन जाधव यांनी केली आहे.