+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule22 Oct 24 person by visibility 208 categoryसामाजिक
कोल्हापूर : वयात येताना मुलींना आरोग्याच्या काही समस्या निर्माण होतात. मात्र त्याबाबत मुली पालकांशी मनमोकळा संवाद साधत नाहीत. त्यामुळे आजार वाढू शकतो. मुलींनी मनमोकळेपणाने आपल्या आईशी आरोग्याबद्दल बोलायला हवे, असे आवाहन भागीरथी संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी केले.

 लक्षतीर्थ वसाहतीमधील प्रबुध्द भारत हायस्कूलला सॅनिटरी मशीन वितरण समारंभात त्या बोलत होत्या.
भागीरथी संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने, लक्षतीर्थ वसाहतीमधील प्रबुध्द भारत हायस्कूलला सॅनिटरी नॅपकीन मशीन देण्यात आले आहे. अरुंधती महाडिक यांच्या हस्ते हे मशीन शाळेकडं सुपूर्द करण्यात आले.

 भागीरथी संस्थेच्यावतीनं आजवर जिल्ह्यातील हजारो महिलांचे संघटन करुन, त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी देण्यात आल्या. आता रोटरी मिडटाऊनच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सौ. अरुंधती महाडिक यांनी जिल्ह्यात सामाजिक कामांचा धडाका लावलाय, असे उद्गार शिवानी पाटील यांनी काढले. वयात येताना मुलींना काही आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. पण मुली त्याकडे दुर्लक्ष करतात. वास्तविक मुलींनी आरोग्याच्या समस्येबाबत पालकांशी मनमोकळेपणे बोलणे गरजेचे आहे, असा सल्ला अरुंधती महाडिक यांनी दिला.

 भागीरथी संस्थेच्यावतीने किशोरवयीन मुलींच्या आरोग्याबाबत आणि स्वसंरक्षणाबाबत जागृती केली जात असल्याचे महाडिक यांनी नमूद केले. मुख्याध्यापक एस. एस. आर्दाळकर यांनी भागीरथी संस्था आणि रोटरीच्यावतीनं राबवल्या जाणार्‍या उपक्रमांचे कौतुक केले. तर रोटरीचे सचिव बी. एस. शिंपुकडे, राहुल पाटील यांनी रोटरीच्या उपक्रमांची माहिती दिली.

 माजी मुख्याध्यापिका शन्मुखा आर्दाळकर यांच्यासह एस. पी. पाटील, वसंत आर्दाळकर आणि विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होत्या.