+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule22 Oct 24 person by visibility 232 categoryराज्य
पुणे: महाराष्ट्र केसरी पहिलवान अभिजीत कटके यांच्या पुण्यातील घरी प्राप्ती कर विभागाने छापा टाकला आहे. त्यांच्या घरातून महत्वाची कागदपत्रे पथकाने ताब्यात घेतली आहेत. अभिजीत कटके हे भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे मेहुणे आहेत.

अभिजीत यांचे वडील चंद्रकांत कटके यांच्या वाघोलीतील घरात मंगळवारी सकाळी प्राप्ती कर विभागाचे अधिकारी पोहोचले होते. पथकाने कागदपत्रांची झाडाझडती घेत, कटके यांच्याकडे विचारपूसही केली. दरम्यान, कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून बंडखोरी करण्याच्या प्रयत्नातील असल्याची भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे सासरे हे चंद्रकांत कटके आहेत. त्यांच्या घरी छपा टाकल्यामुळे ही राजकीय खेळी असल्याची चर्चा रंगली आहे. 

 दरम्यान, यापुर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बालवडकर यांच्या घरी जाऊन त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांनीही त्यांच्यासोबत चर्चा केली होती. महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांनी एकदा महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवला. तर दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी ठरले आहे.