कोल्हापूर : कोल्हापुरात शाहूपुरीत २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकारी निवास पाटील याला अटक करण्यात आली. ही कारवाई आज सोमवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
तक्रारदार यांचे ऑइल व ग्रीस रिपॅकिंग करण्याची कंपनी आहे. निवास पाटील, (वय - 45 वर्षे, पद - राज्य कर अधिकारी, वर्ग -2, सद्या - रा.ए - 605, रॉयल आस्टोनिया न्यू पॅलेस मागे गेटजवळ, नागळा पार्क, कोल्हापूर, मुळ रा.कोलोली, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर) यांने तक्रारदार यांना कंपनीची कागदपत्रे जीएसटी विभागाचे नियमाप्रमाणे आहेत का याबाबत नोटीस पाठवली होती.
दरम्यान मुदतीत निवास पाटील यांने तक्रारदार यांची कंपनीस भेट देऊन त्यांचे कंपनीचा बँकेचा अकाउंट नंबर जीएसटी पोर्टलला नोंदवला नाही म्हणुन तक्रारदार यांना दीड ते दोन लाख रुपये दंड होईल असे सांगून दंड नको असेल तर 25,000/- रुपये द्यावे लागतील असे म्हणून तक्रारदार यांच्याकडे 25000/-₹ लाचेची मागणी केली त्यानंतर निवास पाटील यांने तक्रारदार यांचेकडून 25,000/-रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी यांचेविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाणे, जि. कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई पर्यवेक्षण अधिकारी वैष्णवी पाटील, पोलीस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आसमा मुल्ला, पोलीस निरीक्षक, पो.हे.कॉ.अजय चव्हाण, पो.हे.कॉ.विकास माने, पो.हे.कॉ. सुनील घोसाळकर, पो.ना.सुधीर पाटील, पो.ना.सचिन पाटील, पो.कॉ.कृष्णा पाटील, चा. पो. हे.कॉ.कुराडे,पो.कॉ.दावणे ला.प्र.वि.कोल्हापूर पथकाने केली.