+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule22 Oct 24 person by visibility 778 categoryमहानगरपालिका
▪️प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून सकाळी 6 वाजता वर्कशॉप विभागाची अचानक केली पाहणी

कोल्हापूर : शहरातील कच-याचा प्रश्न गंभीर झाल्याने प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज सकाळी 6 वाजता शास्त्रीनगर येथील वर्कशॉपला अचानक भेट दिली. यावेळी येथून कचरा संकलन करणा-या 17 ॲटोटिप्पर 6.45 नंतरही बाहेर पडले नसलेचे आढळून आलेने या गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त व मुख्य आरोग्य निरिक्षकांना दिले. 

तसेच दोन वाहनचालक प्रभागात न जाता हुतात्मा गार्डन येथे रस्त्याकडेला वाहन पार्किंग करुन बसलेचे निदर्शनास आलेने या दोन्ही ड्रायव्हरांचेही एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश दिले.

 प्रभागात टिप्पर गाड्या वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी प्रशासकांना आल्याने त्यांनी आज सकाळी अचानक वर्कशापची फिरती करुन पाहणी केली. यावेळी प्रशासकांनी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, सहा.आयुक्त नेहा आकोडे, संजय सरनाईक यांना तातडीने सकाळी 6.30 वाजता वर्कशॉपमध्ये बोलावून घेऊन टिप्परवरील संबंधीत ठेकेदारांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

 सर्व गाडयांचा वेळोवेळी मेन्टनन्स करुन घ्यावा. ॲटो टिप्परवर जे जीपीसी ट्रॅकींग सिस्टिीम आहे त्या सर्व गाडयांच्या रुटची तपासणी करा. ज्या तीन गाडया बंद आहेत त्या तातडीने दुरुस्त करुन सुरु करा. ॲटोटिप्परला डिझेल भरण्यासाठी 7 ते 8 एैवजी सकाळी 5 ते 6 यावेळेत डिझेल भरण्याची व्यवस्था करावी.

 तसेच सर्व गाडयांचे पंक्चर काढण्यासाठी बाहेर जावे लागते. त्याएैवजी नेमलेल्या एजन्सीने वर्कशॉपमध्ये जागेवरच पंक्चर काढा. त्यामुळे गाडयांचा वेळही वाचेल अशा सूचना वर्कशॉप विभागाला दिल्या.