+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule22 Oct 24 person by visibility 315 categoryउद्योग
कोल्हापूर : कार्बन क्रेडीट योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ,कोल्हापूर (गोकुळ) व एन.डी.डी.बी.मृदा तसेच सिस्टीम बायो यांच्या आर्थिक व तांत्रिक सहकार्यातून ‘गोबरसे समृद्धी’ कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण देशामध्ये गोकुळने ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबविली असल्याने जिल्ह्यातील गोकुळच्या ५,७४३ दूध उत्पादकांचे अत्यंत अल्प किमतीत बायोगॅस प्रज्वलित झाले आहेत. या बायोगॅस योजनेमुळे जिल्हयातील महिला दूध उत्पादकांना २० कोटी २५ लाख इतके अनुदान मिळाले आहे. मागील वर्षी या योजनेला दूध उत्पादकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे या योजनेच्या टप्पा दोन मध्ये सन २०२४-२५ साला करिता नवीन ४,००० बायोगॅस मंजूर झाले असल्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले.  

या योजनेमधील बायोगॅसच्या नवीन मॉडेलमध्ये वाढीव क्षमता व सुरक्षिततेसाठी काही सुधारणा केल्या असून, यामध्ये दीर्घकाळ चालणारा आधुनिक चार्जिंग लाइटर, शेण कालावण्यासाठी मिक्सिंग टूल (मिक्सर), गॅसच्या सुरक्षिततेसाठी जादा सेफ्टी व्हॉल्व व पुनर्वापर करता येणारा फिल्टर या नवीन गोष्टीचा समावेश केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती कार्बन क्रेडीट अनुदानात घट झाल्यामुळे सिस्टीमा कंपनीच्या टप्पा दोन मधील नवीन बायोगॅसचे अनुदान कमी झाले आहे. २ घनमीटर बायोगॅस युनिटची वरील सुधारणेसह एकूण रु.४१,२६० इतकी किमत असून, अनुदान वजा जाता रुपये ९,९९९ इतकी रक्कम दूध उत्पादकांनी भरणा करावयाची आहे. बायोगॅसचे अंतर १५० फुटापेक्षा जास्त असलेस १५०० रुपये बुस्टर पंपासाठी भरावयाचे आहे.     

कार्बन क्रेडीट बायोगॅस योजनेमुळे हजारो दूध उत्पादक महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून. दूध उत्पादक कुटुंबाच्या घरगुती वापरासाठी होणाऱ्या गॅस सिलेंडरच्या खर्चामध्ये वार्षिक जवळ जवळ १५ ते १८ हजार रुपयांची बचत होत आहे. तसेच बायोगॅस मधून बाहेर पडणारी बायोस्लरी शेतीला सेंद्रिय खत म्हणून वापरली जात असल्यामुळे खतांच्या खर्चामध्ये ५० टक्के बचत होऊन शेतीचे सेंद्रिय उत्पादन वाढण्यास मदत होत आहे. या बायोगॅस योजनेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास नक्कीच हातभार लागला आहे. या नवीन योजनेमध्ये १५०० महिला दूध उत्पादकांनी नोंदणी केली असून जिह्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले आहे.