+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule21 Oct 24 person by visibility 248 categoryगुन्हे
कोल्हापूर : रेकॉर्डवरील महीला गुन्हेगार यांच्या कब्जातुन २,१०,०००/- रु. किंमतीचा २७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूरने केली.

 महेश खोत व शुभम संकपाळ यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील महिला गुन्हेगार ज्योति उर्फ जोताबाई नामदेव पाटील (रा. जयसिगंपूर, ता. शिरोळ) यांनी वडगांव बाजार समिती, इचलकरंजी येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याचा धनहार चोरला असुन त्या आज दि. २१/१०/२०२४ रोजी ताराराणी चौक, कोल्हापूर येथे चोरलेला सोन्याचा धनहार विकण्यासाठी येणार आहेत. अशी माहिती मिळालेने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व पोलीस पथकाने ताराराणी चौक जवळ, कोल्हापूर येथे सापळा लावला असता जोताबाई पाटील ह्या हातात प्लस्टिकची पिशवी घेवुन येत असल्याच्या दिसुन आलेने त्यांना थांबवुन नाव पत्ता विचारला असता त्यानी त्यांचे नाव ज्योती उर्फ जोताबाई नामदेव पाटील (वय.६६, रा. संभाजीनगर, नांदणी रोड, लक्ष्मी नारायण हायस्कुल शेजारी, जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता त्यांनी गुन्हा केलेचे कबुली देवुन त्यांचेकडून २७ ग्रॅम वजनाचा सोन्याचा दोनपदरी धनहार जप्त करून इचलकरंजी पोलीस ठाणे कडील दाखल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपी महीलेस ताब्यात घेवुन जप्त मुद्देमालासह पुढील तपासकामी जयसिंगपूर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

ज्योती उर्फ जोताबाई नामदेव पाटील यांचेवर करवीर पोलीस ठाणे, देवरूख पोलीस ठाणे, जि. रत्नागिरी येथे चोरी व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार महेश खोत, शुभम संकपाळ, संजय कुंभार, महेश पाटील, सुशिल पाटील, कृष्णात पिंगळे, अमित मर्दाने, महीला पोलीस अंमलदार धनश्री पाटील यांनी केली आहे.