घोडावत विद्यापीठातील दोनशेहून विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट
schedule16 May 25 person by visibility 120 categoryशैक्षणिक

अतिग्रे: संजय घोडावत विद्यापीठाने या वर्षीही चांगल्या प्लेसमेंटची परंपरा कायम राखत 2024-25 अकॅडेमिक वर्ष संपण्याचा आधीच २०० हुन अधिक विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकरी प्राप्त करून दिली. अभियांत्रिकी, एम.बी.ए, फार्मसी, सायन्स, एम.सी.ए, बी.सी.ए या सारख्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.
विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी ट्रैनिंग अँड प्लेसमेन्ट विभाग कार्यरत आहे. या विभागातर्फे इंडस्ट्री रेडी इंजिनिर्स व बिझिनेस रेडी प्रोफेशनल्स तयार करणे हे उद्दिष्ठ्य ठेवून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. विद्यार्थ्यांची प्लेसमेंटसाठी तयारी दुसऱ्या वर्षापासून सुरु होते. यामध्ये सॉफ्ट स्किल्स, ऍपटीट्युड टेस्ट्स, इंटरव्हियू स्किल्स, पेर्सोनालिटी डेव्हलोपमेंट या बरोबर डोमेन विषय याचा समावेश असतो. यासाठी विद्यापीठ व बाहेरील तज्ञ नेमले जातात.
या वर्षी विद्यार्थ्यांची विप्रो, आई टी सी, जेड ग्लोबल, ग्लोबल स्पेस, आर स्वेअर सॉफ्ट, आबोट लॅब्स, सिप्ला, हायटेक डिजिटल सोलुशन, एमीकॉम, एमिप्रो, वेलनेस फॉरेव्हर, घोडावत ग्रुप, ऐरोचाम्प एविएशन या सारख्या व इतर अनेक कंपन्यांमध्ये निवड झाली.
विद्यार्थ्यांच्या झालेल्या निवडी बद्दल विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
विद्यार्थ्यांना ट्रैनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. एन.व्ही पुजारी, डे. टीपीओ मिलिंद पाटील, विविध विभागांचे विभागप्रमुख व टीपीओ समन्वयकांचे मार्गदर्शन लाभले.