‘केआयटी’ चा विद्यार्थी शाहू माने शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित
schedule11 May 25 person by visibility 371 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : केआयटी कॉलेजचा विद्यार्थी शाहू माने याला राज्य शासनाने नुकतेच शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले.राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे शुभ हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच नामदार चंद्रकांत पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत हा सोहळा बालेवाडी क्रीडा संकुल येथे नुकताच पार पडला.
अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमबाजी मध्ये सर्व प्रकारच्या पदकांची लय लूट करणारा हा तरुण खेळाडू आज भारताचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये करत आहे.
केआयटी चे अध्यक्ष साजिद हुदली यांनी शाहू माने व त्यांच्या आई-वडिलांचा महाविद्यालयात यथोचित सत्कार सन्मान केला.महाविद्यालय फक्त अभियंतेच नाही आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू अभियंते घडवत असल्याचे संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी नमूद केले.या माझ्या पुरस्कारामध्ये केआयटी चे योगदानही अत्यंत महत्त्वाचे आहे अशा भावना शाहू माने याने व्यक्त केल्या.या प्रसंगी मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ.उदय भापकर उपस्थित होते.