कळंबा येथे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी, अंबाबाई देवीचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात
schedule11 May 25 person by visibility 360 category

कळंबा : येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी, अंबाबाई देवीच्या उत्सवानिमित्त आज रविवारी सकाळी अंबाबाई देवीची पालखी कात्यायनी देवीच्या भेटी जाण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक ग्रामस्थ सहभागी झाले होते.
रविवार दिनांक 11 मे रोजी सकाळी आठ वाजता कात्यायनी देवीच्या भेटीचा पालखी सोहळा पार पडला या पालखी सोहळ्याच्या श्री अंबाबाई देवीची विधिवात पूजा अर्चा झाल्यानंतर मंदिरास प्रदक्षिणा घातल्यानंतर या पालखीने कात्यायनी मंदिराकडे प्रस्थान केले. कात्यायनी येथे धार्मिक विधी झाल्यानंतर पालखी मंदिरामध्ये दाखल झाली. यावेळी अंबाबाई देवीचा जयघोष पारंपारिक वाद्यांमध्ये पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भक्तगण महिला, ग्रामस्थ श्री महालक्ष्मी अंबाबाई भक्तगण मंडळाचे पदाधिकारी सदस्य सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले.
आज रात्री नऊ वाजता बजरंग दल कळंबा आयोजित ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 12 मे रोजी सकाळी सात वाजता होम हवन घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य दुपारी तीन वाजता सर्व महिलांसाठी कुंकुमार्चन सोहळा, रात्री आठ वाजता मुख्य पालखी सोहळा हनुमान भेटीस तसेच रात्री दहा वार्जता श्रीदत्त सेवा संगीत सोंगी भजन मंडळ पंडेवाडी यांचा कार्यक्रम होणार आहे.
दिनांक 13 मे रोजी सकाळी नऊ वाजता श्री महालक्ष्मी मंदिरात श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली असून सकाळी 11 वाजता महाप्रसाद वाटप होणार आहे. रात्री दहा वाजता स्वर विठ्ठलाई कलाविष्कार प्रस्तुत गौरव माय मराठीचा हा मराठमोळा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
