केरळमध्ये २७ मेपर्यंत मान्सूनचे आगमन
schedule11 May 25 person by visibility 216 categoryराज्य

मुंबई : मान्सून अंदमानच्या समुद्रात यंदा लवकर दाखल होणार असुन मान्सून भारतात लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने या संदर्भात २७ मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचू शकतो. १३ मेपर्यंत दक्षिण अंदमानचा समुद्र, बंगालच्या उपसागराचा आग्नेय भाग आणि निकोबार बेटांपर्यंत मान्सून पोहोचण्याचे पूर्वानुमानही वर्तवण्यात आले.
केरळमध्ये दाखल होण्याचा सर्वसाधारण दिवस १ जून आहे. मात्र यंदा मान्सूनचा अंदमानच्या समुद्रापर्यंतचा प्रवासही आधी सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मान्सूनचा पुढचा प्रवासही सुरळीत पार पडण्याची शक्यता आहे. १ जूनला मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवताना यामध्ये मान्सून आगमनाच्या तारखेच्या पुढे- मागे सात दिवसांचा कालावधी गृहीत धरला जातो.
२३ ते ३१ मे या कालावधीत यंदा मान्सूनचे आगमन अपेक्षित आहे. मुंबईत १० जूनला व सह्याद्री ओलांडून महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात १५ जूनला मान्सून अपेक्षित आहे.